Maulana Abul Kalam Azad : राष्ट्रीय शिक्षण दिन कसा सुरु झाला ?

75
Maulana Abul Kalam Azad : राष्ट्रीय शिक्षण दिन कसा सुरु झाला ?
Maulana Abul Kalam Azad : राष्ट्रीय शिक्षण दिन कसा सुरु झाला ?

राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day 2023) ११ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारताचे पहिले शिक्षण मंत्री (First Education Minister of India) मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांच्या जन्मदिनाच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. मौला अबुल कलाम आझाद १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ पर्यंत शिक्षण मंत्री होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता देण्यात आली.

कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद?

मौलाना अबुल कलाम आझाद हे भारतीय राजकीय नेते होते. त्यांचे खरे मोहिउद्दीन अहमद असे होते. त्यांना अबुल कलाम ही पदवी देण्यात आली होती. याचा अर्थ म्हणजे वाचस्पती. ’आझाद’ ही त्यांना उपाधी मिळाली होती. मौलाना आझाद हे कवी आणि पत्रकार देखील होते. ते महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय होते. १९२३ मध्ये ते कमी वयातच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये ते निवडून आले आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री झाले.

(हेही वाचा – Ganesh Vandana : गणेशवंदनेविषयीची रोचक माहिती)

मौलाना आझाद यांचा जन्म

मौलाना आझाद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. त्यांचे आफगाण उलेमाओ या घराण्याशी संबंध होते, हे घराणे बाबरच्या काळात हेरातमधून भारतात आले होते. त्यांची आई अरबी वंशीय होती व वडील मोहम्मद खैरुद्दीन हे फारसी होते. मोहम्मत आणि त्यांचे कुटुंब १८५७ च्या स्वातंत्रसमरादरम्यान कोलकोता सोडून मक्कामध्ये गेले. ते १८९० मध्ये पुन्हा भारतात आले. मोहम्मद खैरुद्दीन पुढे मुस्लिम मौलाना विद्वान झाले. आझाद ११ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

मौलाना आझाद यांचे शिक्षण

मौलाना आझाद हे शिक्षण मंत्री होते तरी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुस्लिम पद्धतीनेच झाले. त्यासोबत इतिहास, गणित या विषयाचे त्यांनी शिक्षण घेतले तर उर्दू, फारसी, हिंदी, अरबी, इंग्रजी या भाषांचा त्यांनी अभ्यास केला. मात्र भारताचा पहिला शिक्षण मंत्री कधीही अधिकृतपणे शाळेत किंवा कॉलेजमध्ये गेला नव्हता. त्यांनी खिलाफत हा भयावह चळवळीला देखील पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर असहयोग आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर १९९२ रोजी त्यांना भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला.

(हेही वाचा – Road Cement Concreting : कंत्राट रद्द प्रकरणी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता अधिक)

पहिल्या IIT ची स्थापना

आझाद यांच्या नेतृत्वाखाली १९५१ मध्ये देसातील पहिल्या IIT ची स्थापना झाली . तसेच त्यानंतर १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची आणि माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना देखील त्यांच्याच काळात झाली. मात्र जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची स्थापना करण्यात देखील त्यांची पुष्कळ कष्ट घेतले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.