Biporjoy Cyclone : गुजरात राज्याला ऑरेंज अलर्ट जारी; ६७ रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना

१५ जून रोजी हे चक्रीवादळ १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे.

126
Biporjoy Cyclone : गुजरात राज्याला ऑरेंज अलर्ट जारी; ६७ रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) भारतात प्रभाव दिसून येत आहे. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरात राज्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

(हेही वाचा – Pune Fire : मार्केटयार्डमध्ये अग्नितांडव सुरूच; हॉटेलला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू)

६७ रेल्वे गाड्या रद्द…

अरबी समुद्राला उधाण आलं आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी हे चक्रीवादळ १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमची स्थापना केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ अनिल कुमार लाहोटी आणि इतर बोर्ड सदस्य परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

१३ जून ते १५ जून या दरम्यान ९५ गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. तर ६७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या (Biporjoy Cyclone) प्रभावादरम्यान, स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल पुरेशा साठ्यासह उघडे राहतील जेणेकरून अडकलेल्या प्रवाशांना त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

बिपरजॉय चक्रीवादळामुळं (Biporjoy Cyclone) १५ आणि १६ जून रोजी कच्छ आणि गुजरातच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (१२ जून) एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला उधाण आल्याचं दिसत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील खाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.