Biporjoy Cyclone : येत्या 36 तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार ; ‘या’ चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'बिपरजॉय' (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

205
Biporjoy Cyclone : येत्या 36 तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार ; 'या' चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकेल.

या पार्श्वभूमीवर (Biporjoy Cyclone) मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

दक्षिण अरबी समुद्राच्या (Biporjoy Cyclone) आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. अशातच कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे.

(हेही वाचा – Amarnath yatra : यंदा अमरनाथ यात्रेला जाणार असाल, तर प्रतिबंध घातलेल्या अन्नपदार्थांची यादी वाचा)

तसेच 8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर (Biporjoy Cyclone) समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवर कोणीही जाऊ नये असे हवामान खात्याने सांगितले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पाऊस होणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.