Biporjoy Cyclone : राजस्थानमध्ये १४ ट्रेन, २ विमान उड्डाण रद्द; ४ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

बाडमेर, सिरोही, उदयपूर, जालोर, जोधपूर जिल्ह्यात पाऊस पडत असून ताशी ५० ते ६० किमी (Biporjoy Cyclone) वेगाने वारे वाहत आहेत.

104
Biporjoy Cyclone : राजस्थानमध्ये १४ ट्रेन, २ विमान उड्डाण रद्द; ४ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केलं आहे. ‘बिपरजॉय’च्या (Biporjoy Cyclone) प्रभावामुळे गुजरातमधील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच आता या चक्रीवादळाने राजस्थानाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) शुक्रवार १६ जून रोजी संध्याकाळी राजस्थान येथे धडकलं.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी (१७ जून) सकाळपासून बाडमेर, सिरोही, उदयपूर, जालोर, जोधपूर जिल्ह्यात पाऊस पडत असून ताशी ५० ते ६० किमी (Biporjoy Cyclone) वेगाने वारे वाहत आहेत.

हवामान खात्याने बाडमेर, जालोर, सिरोही आणि पालीसाठी रेड अलर्ट (Biporjoy Cyclone) जारी केला आहे. त्याचवेळी, रेल्वेने बाडमेरमधून जाणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे उदयपूरहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.

(हेही वाचा – पोटदुखीवर उपचार म्हणून नवजात बाळाच्या पोटावर दिले बिब्ब्याचे चटके)

आतापर्यंत अनेक गावातील पाच हजार लोकांना (Biporjoy Cyclone) सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे. राजस्थानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळचा प्रभाव येत्या रविवार पर्यंत म्हणजेच १८ जून पर्यंत राहील. तसेच वादळाच्या प्रभावामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे.

दरम्यान जालोर, बाडमेर, जोधपूर येथे झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. तसेच ठिकठिकाणी झाडे व विजेचे खांब देखील उन्मळून (Biporjoy Cyclone) पडले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ सेवा बंद
  • उत्तर-पश्चिम रेल्वेने जोधपूर-बाडमेर, बाडमेर-मुनाबाव, जोधपूर-भिलडी, जोधपूर-पालनपूर आणि अमृतसर-गांधीधाम दरम्यान धावणाऱ्या १४ गाड्या रद्द केल्या आहेत.
  • उदयपूरच्या महाराणा प्रताप विमानतळावरून शनिवारी (१७ जून) उड्डाण केलेल्या एअर इंडियाची दोन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरहून दिल्लीला जाणारे दुपारी १ वाजताचे फ्लाइट आणि ४.३० वाजताचे मुंबईला जाणारे फ्लाइट रद्द करण्यात आले आहे.
  • पालीचे कारखाने दोन दिवसांपासून बंद आहेत.
  • जोधपूरमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग संस्था, जिम, पर्यटनस्थळे, उन्हाळी शिबिरे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.