MD-MS Admission साठी मोठा दिलासा; बंधपत्रित सेवेला वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

72
MD-MS Admission साठी मोठा दिलासा; बंधपत्रित सेवेला वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती
  • प्रतिनिधी

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (MD/MS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शासकीय व निमशासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय प्रवेश नाकारण्याच्या अटीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती लागू केली आहे, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (MD-MS Admission)

(हेही वाचा – FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर)

2017 चा निर्णय आता थांबवला!

2017 मध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता की, शासकीय किंवा महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवले जाणार नाही. ही अट 2019-20 पासून लागू करण्यात आली होती. मात्र, या अटीविरोधात विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. (MD-MS Admission)

(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादि मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी धोरणाला स्थगिती

मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, पदव्युत्तर प्रवेश परीक्षा जून महिन्यात होणार असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही स्थगिती दिली गेली आहे. बंधपत्रित सेवेची अंमलबजावणी करताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आवश्यक जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. पण जागांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊनच या धोरणास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (MD-MS Admission)

(हेही वाचा – Amit Shah यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अभिनंदन; ‘अनादि मी अनंत मी’ गीताची हिंदी आवृत्ती एक्सवर पोस्ट)

विद्यार्थ्यांना दिलासा, प्रवेश मार्ग मोकळा

या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमडी, एमएस प्रवेशासाठी अडथळा दूर झाला असून, प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही “या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील प्रवास सुकर होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. (MD-MS Admission)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.