कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; Shirdi Airport वर ‘या’ सुविधा मिळणार

172
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; Shirdi Airport वर ‘या’ सुविधा मिळणार
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; Shirdi Airport वर ‘या’ सुविधा मिळणार

Shirdi Airport: आगामी कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela) जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी मंत्रीमंडळाडून वेळोवेळी आढावा बैठक घेण्यात येते आहे. तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरचा ताण हलका होणार आहे. तसेच अमरावती विमानतळावरील (Amravati Airport) धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी बैठकीत दिले. (Shirdi Airport)

(हेही वाचा – लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी कोर्टाचा मान ठेवणार का? मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उपस्थित केला सवाल)

दरम्यान, आगामी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड आणि ८ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या (Maharashtra Airport Authority) बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे. या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा. शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे (Shirdi Airport Cargo Terminal) काम वेगाने सुरू आहे.

(हेही वाचा – Unauthorized Construction : रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा)

नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. त्यासाठी शिर्डी विमानतळावर ८ वाहनतळे, दोन हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.