Mumbai Police दलात मोठे बदल; आता गुप्तचर विभागाला मिळणार नवे नेतृत्व!

118

Mumbai Police : पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तनाव निर्माण झाला आहे. तणावा नंतर मुंबईतील दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेलवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस दलात ‘गुप्तवार्ता विभाग’ सुरू करण्यात आला आहे. या विभागाची जवाबदारी सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई पोलीस दलात पाच ऐवजी ६ सहपोलिस आयुक्त असणार आहे. लवकरच सहावे सहपोलीस आयुक्तांचे पद भरले जाणार आहे. शहराच्या अंतर्गत सुरक्षा चौकटीत वाढ करण्यासाठी अलीकडील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारने या नवीन पदाला मान्यता दिली. (Mumbai Police)

मुंबई पोलिसांकडे कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे, प्रशासन, वाहतूक आणि आर्थिक गुन्हे हाताळणारे पाच सहआयुक्त होते. “मुंबईत, गुप्तचर माहिती गोळा करण्याचे काम विशेष शाखेकडून केली जाते. ज्याचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जाचे) करतात आणि ही विशेष शाखा पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांना त्याचा अहवाल देतात. यापुढे विशेष शाखेचे नेतृत्व सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करतील, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

विशेष शाखा शहरातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवत गुप्त माहिती गोळा करते. तसेच स्लीपर सेल आणि (दहशतवादाच्या) सहानुभूती असलेल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल.

(हेही वाचा – Vasai-Virar मध्ये ईडीचे छापे: अधिकाऱ्याच्या घरातून ८ कोटी रोकड आणि २३.२५ कोटींचे दागिने जप्त)

नवीन यंत्रणेअंतर्गत, विशेष शाखेचे सहआयुक्त थेट पोलिस आयुक्तांना अहवाल देतील आणि कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तांशी जवळून समन्वय साधतील, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “यामुळे गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि वरिष्ठांना वेळेवर माहिती सामायिक करण्यास मदत होईल. जेणेकरून जलद कारवाई करता येईल. सध्या, अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) हे पद रिक्त आहे आणि ते अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या देखरेखीखाली आहे.

(हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १,१५१ दिवस अव्वल, नवीन विक्रम )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले होते
सहपोलीस आयुक्त (गुप्तचर) यांचे मुख्य काम गुप्तचर विभागाला अधिक मजबूत करणे असेल. ही पोस्ट केवळ स्लीपर सेलच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवणार नाही तर कोणत्याही संभाव्य दहशतवादी किंवा असामाजिक कृत्याच्या आशयावर आधारित आगाऊ सूचना देण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.