Bhiwandi Building Collapses : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीस बजावण्यात आल्या

25
Bhiwandi Building Collapses : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी

खूप दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच (Bhiwandi Building Collapses) भिवंडी मधील दोन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, भिवंडी (Bhiwandi Building Collapses) शहरातील गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

(हेही वाचा – Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी,हवेतील गारव्यामुळे मुंबईकर सुखावले)

इमारतीच्या ढिगार्‍याखाली सहा जण अडकले होते

दोन मजली इमारतीच्या (Bhiwandi Building Collapses) मागच्या बाजूचा भाग पूर्णतः कोसळला आहे. ज्यामध्ये अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. यापैकी चार जणांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर भिवंडी अग्निशमाक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

इमारतीला दोन वेळा नोटीस

विशेष म्हणजे भिवंडी शहरातील (Bhiwandi Building Collapses) गौरीपाडा परिसरात असलेल्या या इमारतीला ४० ते ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं या इमारतीला दोन वेळा नोटीसा देखील बजावण्यात आल्या असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्याने दिली आहे. शिवाय या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. इमारत धोकादायक असताना देखील या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम महानगरपालिकेचे होतं, परंतू महानगरपालिकेने फक्त नोटिसा बजावून आपले हात झटकले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.