तेव्हा भगतसिंगांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केले होते आवेदन; पुस्तकातून केला दावा 

120

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सुटकेसाठी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती. त्यावरून काँग्रेस वीर सावरकर यांची बदनामी करत असते, मात्र आता हुतात्मा भगतसिंग यांनीही अशाच प्रकारचे आवेदन पत्र ब्रिटिशांना दिले होते, असा खुलासा एका पुस्तकातून करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये २ जन्मठेप शिक्षा भोगत होते, आयुष्य कारागृहात घालवण्यापेक्षा ब्रिटिशांना सुटकेसाठी आवेदन पत्र देऊन कारागृहातून बाहेर पडणे आणि भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत होणे, असा उद्देश ठेवून वीर सावरकर यांनी ब्रिटिशांना आवेदन पत्रे लिहिली होती. त्यांचा उल्लेख स्वतः वीर सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात केल्यामुळे हे समजले. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढून काँग्रेस वीर सावरकर यांच्यावर वारंवार टीका करत असते, जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेपासून दूर जाते तेव्हा सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसचे नेते वीर सावरकर यांच्या आवेदन पत्राचा उल्लेख करून टीका करत असते. वास्तविक अशी आवेदन पत्रे महात्मा गांधी यांनीही लिहिली होती, हेही समोर आले आहे. मात्र काँग्रेस जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असते. खरे तर त्यावेळी कारागृहातील राजबंदी यांना अशी आवेदन पत्रे देण्याचा कायद्याने दिलेला अधिकार होता. त्यामुळे जसे महात्मा गांधी यांनी या अधिकाराचा वापर केला तसाच वीर सावरकर यांनीही केला होता. आता हुतात्मा भगतसिंग यांनीही अशी आवेदन पत्रे दिले होती, असा खुलासा करण्यात आला आहे. ‘सम हिडन फॅक्टस मार्टेडेम ऑफ शहीद भगतसिंग’ या पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. कुलवंत सिंग कुनर आणि गुरप्रीत सिंग सिन्द्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

(हेही वाचा देशातील अनेक वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सची नजर; सरकारकडून सतर्कतेचा इशारा)

काय म्हटले आहे या पुस्तकात? 

८ मार्च १९३१ ला मित्रांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर भगतसिंग यांनी बिजॉय कुमार यांना आपल्या वतीने ब्रिटीश सत्तेकडे / सरकारकडे आवेदन करण्याची परवानगी दिली. यातून काय सिद्ध होते? सावरकरांनी सुद्धा आपल्या आणि इतर राजबंद्यांच्या वतीने आवेदन केले. लाहोर कटातील क्रांतीकारकांनीही राम प्रसाद बिस्मिल्ला सारख्यांनीही असे आवेदन केले होते. आता हुतात्मा भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनीही आवेदन केल्याचा उल्लेख बाहेर येऊ लागला आहे. याचा अर्थ ब्रिटीश कायद्यांचा फायदा घेऊन सुटकेचा प्रयत्न करणे हा सशस्त्र क्रांतीकारकांचा गनिमी कावा होता. शत्रूच्या तावडीत सापडून फाशी किंवा पन्नास पनास वर्षे सडण्यापेक्षा या चक्रव्युहातून कसेही करुन बाहेर पडण्यास कोणीच कमीपणा मानत नव्हते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.