बेस्ट बसमध्ये १ मार्चपासून स्मार्ट प्रवेश! कोणाला मिळणार नव्या सुविधेचा लाभ?

157

बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट चलो अ‍ॅप आणि बेस्ट चलो स्मार्टकार्ड सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना १ मार्चपासून बेस्ट बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश मिळणार आहे. मात्र या सुविधेमुळे डिजिटल माध्यमांचा वापर न करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

( हेही वाचा : पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न!)

बेस्टमध्ये स्मार्ट प्रवेश 

१ मार्चपासून बेस्ट बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश हवा असल्यास प्रवाशांन मोबाइलच्या माध्यमातून बेस्ट चलो अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा बेस्टचे चलो कार्ड खरेदी करावे लागणार आहे. यामुळे सुट्ट्या पैशांची अडचण सुद्धा निर्माण होणार नाही असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.

विविध योजना सुरु करणार 

तिकिटासाठी डिजिटल पद्धतीचा वापर वाढावा आणि या योजनेचा प्रसार व्हावा यासाठी ही सेवा घेणाऱ्या प्रवाशांना काही सवलती सुद्धा देण्यात येणार आहेत. याची सुरुवात १ मार्चपासून सुरूवात होणार असून, बेस्ट चलो अ‍ॅप अथवा बेस्ट चलो स्मार्टकार्ड वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. त्यामुळे या डिजिटल सुविधांचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.