वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून आणि इंधन तसेच मोटर वाहनांच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने अंतर्गत वाहतुकीसाठी डिझेलवर चालणा-या मोटार वाहनांऐवजी इलेक्ट्रिकवर चालणारी मोटार वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ म्हणतेय…मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागल्यावर बस ‘BEST’ आहे! )
या मोहिमेअंतर्गत एकूण ११७ इलेक्ट्रिक मोटार वाहने समाविष्ट करण्यात येणार असून त्यापैकी २६ वाहने सद्यस्थितीत तयार असून बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते १५ वाहनांचे उद्घाटन कुलाबा आगारात करण्यात आले. त्यावेळी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी बेस्टच्या ताफ्यात ४०० इलेक्ट्रिक बसगाडया समाविष्ट झाल्या आहेत. या नवीन गाडयांमुळे बेस्टच्या वार्षिक खर्चात देखील २५ टक्के बचत होईल असे मत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले.