हे Best झाले; आता प्रवाशांना बसचे Live Location कळणार

89

Best : मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या बेस्ट बस (Best Bus) संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तासतांस बसची वाढ बघणाऱ्या प्रवाशांसाठी आता प्रतीक्षा संपली आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्यांना यापुढे बसगाड्यांची प्रत्यक्ष माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये बसमार्ग, बसची प्रत्यक्ष आगमनाची वेळ आणि गाडी उशिरा येणार असल्यास त्याचीही माहिती गुगल मॅपवर मिळू शकेल. या संदर्भात बेस्ट बस आणि गूगल मॅप यांच्यामध्ये करार झाला आहे. (Best)

(हेही वाचा  Saharanpur : मदर तेरेसा कॉलेजमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना केले लक्ष्य ; टिळा लावण्यास, पवित्र धागा बांधण्यास मनाई केल्यावर हिंदू संघटना आक्रमक)
   
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक एस व्ही आर श्रीनिवास (BEST General Manager S V R Srinivas) यांच्या उपस्थितीत हा उपक्रमाचा प्रारंभ झाला. या उपक्रमामुळे प्रवाशांना बसगाडीच्या येण्याच्या वेळा, मार्ग आणि संभाव्य विलंब याबद्दलची थेट अद्ययावत माहिती Google Maps एप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना कोणती बस पकडायची याची माहिती मिळेलच. इतकेच नाही तर त्यांच्या थांब्यावर येणाऱ्या बसची प्रत्यक्ष आगमन वेळही दिसेल. यामुळे अंदाजे प्रवास कालावधी तसेच आणि बस उशिरा येत असल्याचीही माहिती मिळेल.

(हेही वाचा – Indo – Pak Cricket : भारत – पाक क्रिकेटवर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य)

प्रत्यक्ष माहितीवर आधारित बस येण्याच्या वेळा गुगल मॅप्सवर हिरव्या किंवा लाल रंगात चिन्हांकित केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल मॅप्स ही माहिती प्रत्यक्षात अद्ययावत करेल. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेस्ट आणि गुगल मॅपमधील हे सहकार्य मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेचा बेस्ट उपक्रमाला देखील फायदा होईल. प्रवाशांना बस मिळण्याबाबतची जी अनिश्चितता होती ती यामुळे दूर होईल. परिणामी प्रवास सोपा होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.