बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रशासन १ जूनपासून मुंबई शहरात विविध मार्गांवर वातानुकूलित (AC) बस सेवा सुरू करत आहे. यासोबतच, दक्षिण मुंबई तसेच पूर्व व पश्चिम उपनगरांतील काही बस मार्ग बदलण्यात येणार आहेत. गुरुवारी बेस्ट कडून या बदलांची अधिकृत घोषणा करण्यात आली. (AC Bus)
मंत्रालय ते शिवाजी नगर टर्मिनस दरम्यान A-८ सेवा
सध्याचा ‘बस क्रमांक ८’ जो मंत्रालय ते शिवाजी नगर टर्मिनस दरम्यान धावत होता, आता एसी बसमध्ये रूपांतरित करण्यात आला असून ‘A-८’ या क्रमांकाने ओळखला जाईल. या मार्गावरील पहिली बस मंत्रालयातून सकाळी ८:०५ वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री १०:५० वाजता असेल. (AC Bus)
(हेही वाचा – ई-बसेसच्या पुरवठ्यावर मंत्री Pratap Sarnaik यांचा जोर; कंपनीला नवीन वेळापत्रकानुसार बसेस देण्याचे निर्देश)
महत्त्वाचे मार्ग बदल आणि नवीन AC सेवा
AC बस सुरू होणारे प्रमुख मार्ग :
मार्ग 44 : काळाचौकी – वरळी
मार्ग 56 : वरळी डेपो – वर्सोवा यारी रोड (फक्त रविवारी AC बस, इतर दिवशी non-AC)
मार्ग 125 : नेव्ही नगर – वरळी डेपो
मार्ग 241: सांताक्रूझ – मालवणी (पूर्वी माहिम – मालवणी)
मार्ग A-25 : कुर्ला डेपो – बॅकबे (आता सायन येथेच संपेल)
पश्चिम उपनगरांतील AC सेवा :
मार्ग 243 : मालाड स्टेशन (पश्चिम) – जनकल्याण नगर
मार्ग 343 : गोरेगाव स्टेशन (पूर्व) – फिल्म सिटी
मार्ग 344 : गोरेगाव बस स्थानक (पूर्व) – संकल्प सोसायटी/नागरी निवारा प्रकल्प-४
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack चा मास्टरमाईंड सैफुल्लाचे फूत्कार; म्हणे, ‘मी आता अधिक प्रसिद्ध झालो’)
नवीन AC सेवा सुरू होणारे मार्ग :
मार्ग 347 : गोरेगाव बस स्थानक (पूर्व) – गोखुलधाम
मार्ग 452 : गोरेगाव बस स्थानक (पूर्व) – मयूर नगर
मार्ग 459 : मुलुंड रेल्वे स्थानक – मालवणी डेपो
मार्ग 602 : कांजूरमार्ग – हिरानंदानी पवई
मार्ग 626 : मालाड स्टेशन (पश्चिम) – भुजाले तलाव
ठाण्यासाठी नवीन AC सेवा – A-490 (AC Bus)
(हेही वाचा – चौकशीदरम्यान Pakistan च्या गुप्तहेर कासिमने काय सांगितले?)
बेस्ट कडून मंत्रालय ते ठाणे बालकुम दरम्यान A-490 ही नवीन AC सेवा सुरू केली जात आहे. तसेच A-175 ही रिंग बस सेवा प्रातिक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा, खुदादाद सर्कल आणि पोर्तुगीज चर्चमार्गे धावेल.
बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांना अधिक चांगल्या व आरामदायी प्रवासासाठी ही सेवा सुरू केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी नवीन वेळापत्रक आणि मार्गातील बदलांची माहिती लक्षपूर्वक पाहून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (AC Bus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community