Best Bus : आता सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी बेस्ट रात्रभर धावणार

नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त २० ते २८ जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार

117
Best Bus : आता सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी बेस्ट रात्रभर धावणार

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी (Best Bus) बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नऊ मार्गांवर २७ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा देण्याचे नियोजन केले होते. मात्र यंदा मुंबईतील गणेशभक्तांचा उत्साह पाहता १९ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. उत्तर पश्चिम मुंबईकडे गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूरमार्गे प्रवर्तित होणार आहेत. या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत सुरु राहतील.

(हेही वाचा – Dagdusheth Ganpati : ‘दगडूशेठ’ गणपती समोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण)

मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली होती. या बैठकीत, गणेशोत्सवकाळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून (Best Bus) बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने नियोजन केले आहे.

गणेशोत्सवकाळात पहिल्या पाच दिवसांत घरगुती गणपतीनिमित्त अनेक जण गावी जातात किंवा काहींच्या मुंबईतील घरीच गणपती येतो. त्यामुळे (Best Bus) बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत मुंबईत रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त २० ते २८ जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच ते सहा विविध मार्गांवर या बस चालवण्यात (Best Bus) येणार आहेत. या बसगाड्यांची सेवा २४ तास उपलब्ध असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.