Beed : एकाच्या बदल्यात २५०; कुत्र्यांनी १ पिल्लू मारल्यावर माकडांनी ‘असा’ घेतला बदला

Beed : माकडे कुत्र्यांना उंच झाडावर घेऊन जात असत किंवा उंचच्या उच इमारतीच्या छतावर घेऊन जायचे आणि फेकून द्यायचे.

193

कुत्र्यांनी माकडाच्या एक पिल्लाला मारले, तर त्याच्या बदल्यात माकडांनी तब्बल कुत्र्यांची २५० पिले मारली आहेत. (Monkey Vs Dogs) त्यामुळे फक्त माणसेच बदला घेत नाहीत, तर माकडेही सर्वात भयानक बदला घेतात, हे दाखवणारी घटना काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात घडली होती. ती आता पुन्हा व्हायरल होत आहे. (Beed)

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack नंतर 24 तासांत तिसरी चकमक ; उधमपूरमध्ये एक जवान हुतात्मा, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढले)

त्या काळात बीडमध्ये माकडांनी धुमाकूळ घातला होता. आता त्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत पुन्हा व्हायरल होत आहेत. ही घटना एका रागातून घडली आहे, ज्यामध्ये कुत्र्यांच्या टोळीने माकडाच्या एका पिल्लाला मारले होते. त्यानंतर माकडे कुत्र्यांना उंच झाडावर घेऊन जात असत किंवा उंचच्या उच इमारतीच्या छतावर घेऊन जायचे आणि फेकून द्यायचे. बीडमध्ये सूड उगवणाऱ्या माकडांनी किमान 250 कुत्र्यांची पिल्ले उंच ठिकाणावरून खाली फेकून मारली आहेत. माकडांनी ही दहशत बीडमधील लऊळ गावात पसरवली होती. त्यानंतर वनविभागाने काही माकडांना सापळा लावून जेरबंदही केले. (Monkey’s revenge beed)

माकडांचा हा धुमाकूळ ४ महिने चालला. त्यामुळे इथले ग्रामस्थही त्रस्त झाले आहेत. माकडांच्या या बदल्यामुळे गावात क्वचितच कुत्रे उरले असतील, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी (Forest Department) संपर्क केला मात्र काही माकडे तरीही वनविभागाच्या जाळ्यात सापडली नाहीत. (Beed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.