Vaijapur Bank Burnt : वैजापूरमध्ये चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक

109

वैजापूर (Aurangabad) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या (Maharashtra Grameen Bank) शाखेला पहाटे लागलेल्या भीषण आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. (Vaijapur Bank Burnt) चोरट्यांनी बँक लुटण्यासाठी गॅस कटरचा वापर केला, मात्र त्यातून स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत चोरटे फरार झाले असून, त्यांनी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

(हेही वाचा – विद्यार्थ्याला Janeu काढायला लावणाऱ्या प्राचार्य आणि कर्मचाऱ्यावर केली ‘ही’ कारवाई)

बँकेच्या शाखा व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी खातेदारांना दिलासा दिला आहे. “या आगीमुळे खातेदारांच्या पैशांना कोणताही धोका नाही. बँकेतील सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत होतील. खातेदारांनी घाबरून जाऊ नये, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असे ढाका यांनी स्पष्ट केले.

२० एप्रिलच्या पहाटे तीनच्या सुमारास काही चोरट्यांनी बँकेचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला. मात्र, गॅस कटर हाताळताना अचानक स्फोट झाला आणि त्यातून आगीचा भडका उडाला. काही मिनिटांतच आग संपूर्ण बँकेत पसरली आणि बँकेची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. आग इतकी भीषण होती की, बँकेच्या इमारतीतील बहुतांश वस्तू आणि कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चोरट्यांनी पलायनासाठी वापरलेली गाडी घटनास्थळाजवळ सापडली आहे. प्राथमिक तपासात ही गाडी चोरीची असल्याचे समोर आले आहे. पोलीस आता गाडीच्या मालकाचा शोध घेत असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेत आहेत.

वैजापूर येथील बँक ही परिसरातील अनेक नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. आगीमुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी बँक प्रशासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Vaijapur Bank Burnt)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.