CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘वातावरणीय बदलामुळे निसर्गचक्र बदलत असून अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असून त्याचाच भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे.

190
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार

अलिकडच्या काळात बांबूपासून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असल्याने नगदी पीक म्हणून उदयाला येत आहे. कोकणासह राज्यातील अन्य भागात हाताला काम देणारा बांबू पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे येत्या काळात १० हजार हेक्टररवर बांबू लावगडीचे राज्याचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे (Agricultural Value Commission) अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव अनुप कुमार, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, दुपारच्या सत्रात राज्यपाल रमेश बैस यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पर्यावरण बदलासह बदलत्या शेती पद्धतीचा आढावा घेतला. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, ‘वातावरणीय बदलामुळे निसर्गचक्र बदलत असून अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असून त्याचाच भाग म्हणून बांबू लागवड (Bamboo Planting) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे. एक बांबू ३२० किलो प्राणवायू निर्माण करतो. इतर वृक्षांच्या तुलनेत ३० टक्के जास्त कार्बन बांबू शोषतो. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होतो. त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होते. उसापेक्षा बाबू लागवड जास्त फायदेशीर आहे.’ (CM Eknath Shinde)

राज्य कृषी मूल्य आयोगाचे (Agricultural Value Commission) अध्यक्ष पटेल म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यामुळे महाराष्ट्रात बांबूला राजाश्रय मिळाला आहे. त्यांच्या प्रयत्नातून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड होत आहे. या शिखर परिषदेस जगभरातील संशोधक आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित शेतकऱ्यांना फायदा होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली देशपांडे यांनी केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – DGP Rashmi Shukla : राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला)

उद्योग क्षेत्राने पुढे आले पाहिजे

वातावरणीय बदलाशी झुंजणारा शेतकरी अनेक प्रयोग करून शेती पिकवत आहे. अशा काळात उद्योग क्षेत्राने पुढे आले पाहिजे. बांबू शेती फायदेशीर आहे असे सांगितले जात आहे. पण त्याला बाजारपेठ मिळवून देण्यात उद्योग क्षेत्राचा (industry sector) मोठा भार उचलावा लागेल, असे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी सांगितले. हवा प्रदूषण, जमिनीची धूप रोखणारा बांबू पर्यावरण रक्षणात मोठी भूमिका बजावतो. आज कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक बांबू लागवडीकडे लक्ष वळवत आहे हे सकारात्मक चित्र आहे. आपल्या देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा वेळी मुळापासून पानांपर्यंत सर्व बाबी कामाला येणाऱ्या बांबूलागवडीचा पर्याय शेतकऱ्यांनी शोधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. (CM Eknath Shinde)

लाखो झाडे गेली कुठे?

राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांनी दरवर्षी होणाऱ्या सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमावर टीका करत अधिकाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, दरवर्षी लाखो झाडे लावण्याची मोहीम होती घेतली जाते. खड्डे काढले जातात. झाडे लावल्याचे फोटो येतात. पण पुन्हा पुढील वर्षी तेथे कसे काय वृक्षारोपण होऊ शकते? मागील वर्षी जर झाडे लावली असतील तर आता पुन्हा तेथे झाडे कशी काय लावली जातात हा संशोधनाचा विषय आहे, असेही म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.