Francis Scott Bridge Disaster: अमेरिकेत जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, २२ भारतीयांपैकी कोणीही जखमी नाही

265
Baltimore Bridge Collapsed: अमेरिकेतील मेरिलँडमध्ये मोठी दुर्घटना, बाल्टिमोर ब्रिजला जहाजाची धडक, २० कामगार बुडाल्याची शक्यता
अमेरिकेतील मेरिलँडमध्ये मोठी दुर्गटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील ‘फ्रान्सिस स्कॉट की’ (Francis Scott Bridge Disaster) पुलाला मोठ्या जहाजाची धडक लागली. यामुळे हा पूल कोसळला. यावेळी पुलावर २० कामगार काम करत होते. या दुर्घटनेत ते बुडाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकन वेळेनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे दीड वाजता घडला. या घटनेचे व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
पाटाप्सको नदीवर (Patapsco River) ही घटना घडली आहे. या नदीवर दोन बाजूंना जोडणारा स्टीलचा पूल (ब्रिज) बांधलेला होता. या पुलाखालून जहाजांची ये-जा होत होती, मात्र मंगळवारी एक जहाज पुलाच्या खांबावर धडकले. या पुलावर कामगार आणि इतर वाहनांचीही ये-जा सुरू होती. यामध्ये कमीत कमी ७ लोक पाण्यात फेकले गेल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पुलावर आदळल्यानंतर जहाजाला आग लागली. हे जहाज सिंगापूर ध्वजांकित जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. जहाज व्यवस्थापन कंपनी सिनर्जी मरीन ग्रुपने सांगितले की, २ वैमानिकांसह सर्व क्रू मेंबर्स भारतीय होते. यापैकी कोणीही जखमी झालेले नाही. जहाज पुलावर आदळल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण झाले नाही. हे जहाज २२ एप्रिलला श्रीलंकेला पोहोचणार होते. दाली असे या जहाजाचे नाव आहे. पूल कोसळल्याने अनेक वाहने आणि त्यावर उपस्थित असलेले लोक पाण्यात पडले.

जहाज आणि पूल यांच्या धडकेचे कारण अद्याप अस्पष्ट
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ लोकं बेपत्ता असून २ जणांना वाचवण्यात यश आले आहे तसेच जहाजातील २२ भारतीयांपैकी कोणीही जखमी झाले नाही त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दाली जहाजाची मालकी असलेल्या कंपनीने सांगितले की, जहाजावर उपस्थित असलेल्या २ वैमानिकांसह संपूर्ण क्रू सुरक्षित आहे. त्यांना दुखापत झालेली नाही. जहाज आणि पूल यांच्या धडकेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जहाजाचे मालक आणि अधिकारी चौकशी करत आहेत.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार,
बाल्टिमोर हार्बरमध्ये पाण्याचे तापमान ९ अंश सेल्सियस आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा २१ अंश सेल्सियसच्या खाली असते तेव्हा शरीराचे तापमानही वेगाने खाली येते. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी बाल्टिमोर बंदरातून सुमारे ५२ दशलक्ष टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक झाली. त्याची किंमत ६.६७ लाख कोटी रुपये होती. या बंदरातून १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला. यामुळे मेरिलँडमध्ये सुमारे १.३९ लाख लोकांची गुजराण होते.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.