Balochistan Liberation Army चा पाकिस्तानला मोठा दणका; पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट ठार

baloch pakistan conflict - बाबुल मोहम्मद हसनी हा पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख एसजंट होता.

82

पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या बलुच लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) आणि लष्करी सैन्यात संघर्ष सुरु आहे. नुकतेच बलुच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने क्वेटामध्ये मोठी ल्ष्करी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी (Babul Muhammad Hassani) याला ठार मारले असल्याचे बीएलएने म्हटले आहे. बीएलएच्या गुप्तचर विभाग झिराबने याची माहिती दिली. (baloch pakistan conflict)

(हेही वाचा – Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल)

बीएलएच्या आर्मीने क्वेटामधील (Quetta) बरुरू रोडवर एका थांब्यावर पाकिस्तानी लष्कराचा (Pakistan Army) एजंट मुहम्मद हसनीच्या वाहनाला लक्ष्य केले. मुहम्मद हसीनीच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्या हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाल्याचे बीएलएने म्हटले आहे. बाबुल मोहम्मद हसनी हा पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख एसजंट होता. मुहम्मद हसनीचे जिहादी स्क्वॉडशी थेट संबंध होते. त्याने कलाटमध्ये एका सशस्त्र टोळीचे नेतृत्व केले होते. तसेच कलाटच्या आसपासच्या भागातही तो सक्रिय होता. मुहम्मह हसनीने बलुच तरुणांन जबरदस्तीने गायब केल्याचा आरोप बीएलएच्या आर्मीने केला होता.तसेच बीएलएने महट्ल होते की, मुहम्मद हसीनेने पाकिस्तान लष्करासोबत मिळून बलुचांविरोधात कारवाया केला होता. यामुळे त्याला ठार करण्यात आले.

सध्या पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तान लष्कराविरोधात सतत कारवाई करत आहे. बीएलएने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील सुरब शहरावर देखील नियंत्रण मिळवले असल्याचे म्हटले आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानी लष्कराविरोधात बीएलएच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लवकरच बलुच लिबरेशन आर्मीचे राज्य असेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.