Bakri Eid : गोकुळधाममधील बकऱ्याच्या कुर्बानीसाठी दिलेली परवानगी अखेर रद्द; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रशासनाने घेतला निर्णय

3415
Bakri Eid : गोकुळधाममधील बकऱ्याच्या कुर्बानीसाठी दिलेली परवानगी अखेर रद्द; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रशासनाने घेतला निर्णय
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम मधील सॅटेलाईट गार्डन दोनमधील डी ३ इमारतीच्या आवारात उघड्या जागेवर कुर्बानी देण्यात येत असल्याने याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळाने महापालिका पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर याला आक्षेप नोंदवल्यानंतर महापालिकेने यासाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे. भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी माध्यमांशी बोलतांना या इमारतीतील खुल्या जागेवर कुर्बानीसाठी दिलेली परवानगी महापालिकेच्यावतीने रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. (Bakri Eid)

(हेही वाचा – Bakri Eid : इमारतीच्या आवारात बकऱ्यांची कुर्बानी; गोरेगावमधील रहिवाशांनी उठवला आवाज)

गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाममधील आरे भास्कर रोडवरील सॅटेलाईट गार्डन फेज टूमधील डी ३ इमारतीच्या आवारात खुल्या जागेत मुस्लिम बांधव बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी देतात. यासंदर्भात येथील राज रुद्रम गृहनिर्माण सोसयटीने भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रिती सातम यांना निवेदन देत याठिकाणी दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला विरोध दर्शवला. मुस्लिम धर्मीय आपल्या सणानिमित्त मंडप बांधून अशाप्रकारे धार्मिक पशुवध करत कुर्बानी देत असल्याने एकप्रकारे आसपासच्या परिसरांमध्ये प्रचंड दुर्गंधीचे वातावरण तसेच किळसवाणा प्रकार दिसून येतो. तसेच अशाप्रकारे खुलेआम बकऱ्यांची कुर्बानी दिली जात असल्याने हे दृश्य पाहून लहान मुलांसह इतरांच्या मनात परिणाम होतो. त्यामुळे याठिकाणी उघड्या जागेवर कुर्बानी देण्यास परवानगी दिली असल्यास ती रद्द करावी अशी मागणी केली होती. (Bakri Eid)

(हेही वाचा – BMC School : महापालिकेच्या शाळेत यंदा पहिल्याच दिवशी मिळणार मोफत शालेय साहित्य)

राज रुद्रम सोसायटीच्यावतीने प्राप्त झालेल्या मागणीची दखल घेत प्रिती सातम यांनी या सर्व रहिवाशांच्या शिष्टमंडळास पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे यांनी भेट घेतली आणि रहिवाशांच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी रहिवाशांनी याबाबत प्रशासनासमोर आपली बाजू मांडून कुर्बानीला विरोध का आहे पटवून देण्याच प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेने या इमारतीतील कुर्बांनीसाठी दिलेली परवानगी रद्द केली. यासंदर्भात प्रीती सातम यांनी माध्यमांशी बोलतांना आम्ही सहायक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रशासनाने ही परवानगी रद्द केली. ही कुर्बांनी रहिवाशी वस्तीमध्ये आहे तसेच मशिदीपासून एक किलोमीटर परिसरात ही कुर्बांनी दिली असल्याने एकप्रकारे नियमांना धरुन केली जात नसून आम्ही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सहायक आयुक्तांनी याची खातरजमा करून तसेच आमच्या भावनांचा विचार करूनही ही परवानगी रद्द केली, त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद मानले आहे. (Bakri Eid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.