Ayushman Bharat Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. दरम्यान या योजनेचा ४० हजारहून अधिक उत्तर भारतीय मुंबईकरांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला, असून केंद्रिय मंत्री तथा भाजपाचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या मार्फत विशेष मोहिम हाती घेतली आहे. (Ayushman Bharat Yojana)
(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi दिल्लीतील आंबा महोत्सवाचे करणार उद्घाटन)
आयुष्मान भारत योजनेचा लाभ ४० हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला असून दररोज नोंदणी देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर उत्तर मुंबईतील गरीब जनतेला या योजनेचा पुरेपूर फायदा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील उत्तर विभागात (उदा. दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि मालाड) विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील लोक राहतात. या भागांमध्ये गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यामुळे एकही गरीब माणूस हा उपचाराविना मृत्यूमुखी पडू नये. यासाठी आयुष्मान भारत योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपले आरोग्य जपावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
कोण करु शकतं अर्ज?
आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव SECC–2011 मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SECC म्हणजे काय? SECC म्हणजे, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.
असा करा ऑनलाईन अर्ज
- सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
- आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
- तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
- मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.
- जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
- तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.
(हेही वाचा – diploma in mechanical engineering : करिअरची जबरदस्त संधी! मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करा आणि कमवा लाखो रुपये)
कांदिवली (Kandivali) पश्चिमेकडील एस.व्ही.रोड येथील लोककल्याण या त्यांच्या कार्यालयात सकाळी ९ ते सायं. ६.३० वाजेपर्यंत कधीही येऊन मोफत आयुष्मान भारत कार्ड तसेच इतर योजनांचे कार्ड बनवू शकता. आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ सगळ्यांना घ्यावा आणि गोरगरिबांचे प्राण वाचावे, यासाठी उत्तर मुंबई (North Mumbai) भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community