Ayodhya Train Accident: अयोध्येत मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले, मनकापूर ते कटरादरम्यान रेल्वे सेवा स्थगित

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र अयोध्या धामजवळ एक मोठा रेल्वे अपघात टळला.

69
Ayodhya Train Accident: अयोध्येत मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले, मनकापूर ते कटरादरम्यान रेल्वे सेवा स्थगित

अयोध्या जंक्शनजवळ शनिवारी, (२० एप्रिल) सायंकाळी मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले. मनकापूर-अयोध्या धाम रेल्वे मार्गावर कटरा-रामघाट थांबा आणि अयोध्या दरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे कटरा-मनकापूर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मालगाडी रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ayodhya Train Accident)

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, मात्र अयोध्या धामजवळ एक मोठा रेल्वे अपघात टळला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. यापूर्वी १८ मार्चला अशाच एका घटनेत साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनचे ४ डबे अजमेर स्थानकाजवळ रुळावरून घसरले होते.

(हेही वाचा – Expiry date उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीसोबत घडलं असं काही!)

लवकरच रेल्वेचे कामकाज पूर्ववत
गोंडा जंक्शनचे वरिष्ठ स्टेशन अधीक्षक आर. एस. मीना यांनी सांगितले की, गोरखपूर ते अयोध्या जाणाऱ्या अप-बीसीएम मालगाडीचे चार डबे शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रुळावरून घसरले. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे लवकरच रेल्वेचे कामकाज पूर्ववत केले जाईल. कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.