Ayodhya Ram mandir : अयोध्येला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत आहात ? ही बातमी तुमच्यासाठी !

Ayodhya Ram mandir : अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात जाण्यापूर्वी ही माहिती नक्कीच वाचायला हवी

295
Ayodhya Ram mandir : अयोध्येला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत आहात ? ही बातमी तुमच्यासाठी !
Ayodhya Ram mandir : अयोध्येला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत आहात ? ही बातमी तुमच्यासाठी !

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आता सर्वांनाच अयोध्येला जाण्याची रामभक्तांना ओढ लागलेली आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात जाण्यापूर्वी ही माहिती नक्कीच वाचायला हवी ! (Ayodhya Ram mandir)

(हेही वाचा – Ambulance: राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार, बोट अँम्ब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश)

रामलल्लाच्या दर्शनाच्या वेळा

राममंदिर सकाळी 7 ते 11:30 पर्यंत भाविकांसाठी खुले असेल. (Ramlalla Darshan) यानंतर प्रभूची मध्यान्ह आरती होईल. विश्रांतीसाठी दुपारी सुमारे अडीच तास मंदिर बंद राहणार आहे. दुपारी २ वाजता पुन्हा मंदिराचे दरवाजे उघडतील आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेता येईल. (Ayodhya)

आरतीला उपस्थित रहाता येईल का ?

राममंदिरात (Ramlala Aarti) जाण्यासाठी श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयातून पास घ्यावा लागेल. आधार कार्ड दाखवून हा पास घेता येईल. सध्या एका वेळी केवळ 30 भक्तांना आरतीमध्ये सहभागी होता येणार आहे.

रामलल्लाच्या दर्शनासाठी शुल्क आहे का ?

राममंदिरात दर्शनासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सकाळी मंगलारती, दुपारी आरती आणि सायंकाळची आरती यांसाठी पास घेणे आवश्यक आहे. लवकर दर्शन घेण्यासाठी कोणी पैसे मागितल्यास ट्रस्टच्या कार्यालयात तक्रार करता येते.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : थंडीच्या कडाक्यातही रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी)

मंदिरात मोबाईल नेता येतो का ?

राममंदिरात अनेक टप्प्यांत सुरक्षा आहे. भक्तांना सेलफोन, स्मार्ट घड्याळे यांसारखी उपकरणे आणि पेनही बाहेर जमा करावे लागतील. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लॉकर रूम आहे. दर्शनापूर्वी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू या लॉकर रूममध्ये जमा केल्या जातात. (ram janmabhoomi)

रामलल्लाचा प्रसाद मिळेल का ?

दर्शनानंतर भाविकांना मंदिरातून प्रसाद दिला जाईल. बाहेरून प्रसाद आणण्याची व्यवस्था नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.