Ayodhya-Ahmedabad Air Service : ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेची सुरुवात

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी महर्षी वाल्मिकी अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचे कार्य निर्धारित कालावधीत पूर्ण करून घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात केंद्रीय मंत्री सिंदिया यांचे आभार मानले.

189
Ayodhya-Ahmedabad Air Service : ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेची सुरुवात

केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी गुरुवार ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीहून अयोध्या ते अहमदाबाद (Ayodhya-Ahmedabad Air Service) थेट विमानसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे, अहमदाबादहून अयोध्येला जाण्यासाठी दर आठवड्याला तीन थेट विमान फेऱ्या उपलब्ध होतील.

या मार्गावर इंडिगो कंपनीच्या विमानांचे (Ayodhya-Ahmedabad Air Service) परिचालन होणार असून ११ जानेवारी २०२४ पासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा अहमदाबाद-अयोध्या-अहमदाबाद विमानसेवेला सुरुवात होईल.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर, कसे असेल स्वरुप? वाचा सविस्तर…)

काय म्हणाले ज्योतिरादित्य एम. सिंदिया ?

उद्घाटनपर भाषणात केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया म्हणाले, “अयोध्या ते अहमदाबाद थेट विमानसेवेमुळे (Ayodhya-Ahmedabad Air Service) या दोन्ही शहरांदरम्यान हवाई संपर्काला चालना मिळेल.” ही दोन शहरे खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतात असे देखील केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की,एकीकडे अहमदाबाद हे शहर भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे तर दुसरीकडे, अयोध्या शहर भारताच्या अध्यात्मिक आणि नागरी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. या दोन शहरांच्या दरम्यान सुरु होणारा थेट हवाई संपर्क या शहरांच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देईल, तसेच प्रवास आणि पर्यटन यांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त ठरेल.

(हेही वाचा – America Air Strike On Houthi : येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनचा हल्ला)

संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारा मार्ग – 

हे विमानतळ ‘केवळ विमानांच्या (Ayodhya-Ahmedabad Air Service) आवागमनाचे स्थान नसून ते त्या त्या भागाची वैशिष्ट्ये, संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारा मार्ग देखील असला पाहिजे’ या पंतप्रधानांनी मांडलेल्या कल्पनेची पूर्तता करणारे आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्र्यांनी केला. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ इमारतीची बाह्य रचना राम मंदिरापासून प्रेरणा घेऊन उभारली असून, टर्मिनल इमारतीमध्ये लावलेली सुंदर चित्रे आणि शिल्पकृती यांतून भगवान रामाच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडते.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण १९ विमानतळांची सोय होणार – 

पुढच्या महिन्यापर्यंत, उत्तर प्रदेशात आझमगड, अलिगढ, मुरादाबाद,श्रावस्ती आणि चित्रकुट अशा पाच ठिकाणच्या विमानतळांचे कार्य सुरु होईल. याखेरीज, २०२४ च्या अखेरपर्यंत जेवार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील परिचालनासाठी सज्ज असेल. भविष्यात, उत्तर प्रदेशमध्ये एकूण १९ विमानतळांची सोय होणार आहे. (Ayodhya-Ahmedabad Air Service)

(हेही वाचा – Bhavesh Bhatt: गुजराती गझलेतील नाविन्यपूर्ण आणि आधुनिकतेचे अग्रदूत)

३००० प्रवाशांची सोय –

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, “सध्या ६५०० चौरस मीटरवर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ इमारतीचा विस्तार झालेला असून भविष्यात ५०,००० चौरस मीटर क्षेत्रावर या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात ३००० प्रवाशांची सोय करण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने सध्या २२०० मीटर लांबीचा असलेला रनवे ३७०० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अयोध्येहूनच अधिक मोठ्या आकाराच्या विमानांची ये-जा होऊ शकेल. (Ayodhya-Ahmedabad Air Service)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानले सिंदिया यांचे आभार –

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी महर्षी वाल्मिकी अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Ayodhya-Ahmedabad Air Service) विकासाचे कार्य निर्धारित कालावधीत पूर्ण करून घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात केंद्रीय मंत्री सिंदिया यांचे आभार मानले. अयोध्येहून सुरु झालेल्या या नव्या हवाई संपर्क सेवेमुळे येथील पर्यटन, व्यापार आणि गुंतवणूक यांच्या वाढीसाठी नवे मार्ग खुले होतील असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.