अमेरिकेतील कोलोराडो (Colorado) राज्यात यहुदी कार्यक्रमादरम्यान एक व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेल हा ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली वापरून हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ८ लोक होरपळले आहेत. हल्ला करताना हल्लेखोर ‘फ्री पॅलेस्टाईन’ (Free Palestine) असे नारे देत असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, एफबीआयने (FBI) या घटनेला आतंकवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. (Attack On Israel Supporters)
(हेही वाचा – Ukraine Attack : युक्रेनचा मास्टरस्ट्रोक रशियावर पडला भारी ! ‘असा’ आखला हल्ल्याचा कट)
मीडिया रिपोर्टनुसार, कोलोराडोच्या बोल्डर शहरात इस्रायली बंदिवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक एकत्र जमले होते. यावेळी एका व्यक्तीनं जमावावर मोलोटोव्ह कॉकटेल्स फेकले. त्याचबरोबर फ्लेमथ्रोअरने (आगीचा फवारा टाकणारे शस्त्र) देखील हल्ला केला. हल्लेखोराची ओळख मोहम्मद साबरी सुलेमान म्हणून झाली आहे. हल्ल्याच्या वेळी तो ‘फ्री पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत होता.
बोल्डरचे पोलिस प्रमुख स्टीफन रेडफर्न यांनी सांगितले की, एका व्यक्तीकडे शस्त्र असल्याचे आणि तो लोकांना जाळत असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. या हल्ल्यात 67 ते 88 वर्षं वयोगटातील सहा व्यक्ती जखमी झाल्या असून, सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Israel Palestine Conflict)
सध्या पोलिसांनी हल्लेखोराविषयी अधिक माहिती दिलेली नाही. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्याच्या मागे एकटाच आरोपी असून घटनेवेळी इतर कोणताही संशयित व्यक्ती दिसून आलेला नाही. विशेष म्हणजे, या हल्ल्यात आरोपी स्वतःही जखमी झाला आहे. त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या जखमांच्या तीव्रतेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर यांनी म्हटले आहे की, “सुरुवातीच्या माहितीनुसार या हल्ल्याची चौकशी विचारधारा प्रेरित हिंसाचाराच्या घटनेच्या रूपात केली जात आहे. तपशील समोर आल्यावर आम्ही या घटनेविषयी स्पष्ट भूमिका मांडू.” (Attack On Israel Supporters)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community