ATM in Railway : आता प्रवासाला जातांना पैशांची काळजी नाही; धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे

123

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी नवनवीन चाचण्या घेतल्या जातात. (ATM in Railway) नुकतीच एक चाचणी घेण्यात आली. ज्यामुळे प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढता येतील. भारतात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या एटीएमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेसच्या (Panchavati Express) एसी डब्यात एटीएम बसविण्यात आले होते. नाशिकमधील मनमाड ते मुंबई (Manmad to Mumbai) दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Waqf Amendment Act : वक्फ कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ! विरोधात 70 हून अधिक याचिका तर सात राज्यांकडून कायद्याची वैधता ठेवण्याची मागणी)

ही चाचणी सुरळीत पार पडली असली, तरी काही प्रसंगी मशिनने सिग्नल दिल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही गाडी कसारा ते इगतपुरी दरम्यान नो-नेटवर्क सेक्शनमधून जाते आणि त्या ठिकाणी बोगदाही येतो. त्यामुळे त्या परिसरात गाडी गेल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यास अडचण येणार आहे.

रेल्वेत एटीएम बसवण्यासाठी मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये (Manmad Railway Workshop) एटीएम मशिनमध्ये विशेष रचना व तांत्रिक बदल करण्यात आले. याशिवाय कोचमध्ये काही स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक सपोर्ट चेंजही करण्यात आले होते. गाडीचा वेग आणि प्रवासादरम्यानही मशीन सुरळीतपणे काम करू शकेल, यासाठी हे सर्व बदल करण्यात आले आहेत. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून एटीएमवर नजर ठेवली जाणार आहे.

सध्या या चाचणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने उपलब्ध करून दिलेल्या एटीएमचा वापर करण्यात आला होता. डब्याच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या पॅन्ट्री स्पेसच्या क्युबिकलमध्ये एटीएम बसविण्यात आले आहे. एटीएम मशिनला शटर दरवाजाने संरक्षण दिले आहे. भारतीय रेल्वेच्या या सुविधेमुळे अशा प्रवाशांना मदत होणार आहे. ज्यांना ट्रेनमध्ये रोख रकमेअभावी समस्यांना सामोरे जावे लागते किंवा जे दुर्गम भागातून प्रवास करतात.

ही ऑन-बोर्ड एटीएम सेवा लोकप्रिय झाल्यास इतर गाड्यांमध्येही ती सुरू केली जाईल, असे भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (ATM in Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.