TasteAtlas : जगाच्या पाठीवर मिसळचा झणझणीत सन्मान; टॉप ५० मध्ये ‘या’ स्थानावर मिळवला बहुमान

192
सुप्रसिद्ध फूड गाईड TasteAtlas ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘जगातील 50 सर्वोत्तम ब्रेकफास्ट’ (50 Best Breakfasts in the World) यादीत भारताच्या तीन पारंपरिक पदार्थांनी स्थान मिळवले आहे. मिसळ, छोले भटुरे आणि पराठा हे ते तीन पदार्थ होत. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळने थेट टॉप 10 मध्ये आपला बहुमान मिळवला आहे. (TasteAtlas)

(हेही वाचा – करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांचा Shiv Sena मध्ये प्रवेश; सोलापूरमध्ये राजकीय भूकंप)

मिसळने मिळवला बहुमान
मिसळ ही केवळ चविष्ट नव्हे, तर विविध टेक्स्चर असलेला एक ‘फ्लेवरचा स्फोट’ आहे. तोंडाला झणझणीत लागणारी, पण पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी ही चव म्हणूनच महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय आहे. मुंबईच्या अगदी कानाकोपऱ्यात वडापाव प्रसिद्ध असला तरी राज्यभर झणझणीत आणि तरीवाली मिसळ खवय्यांच्या आवडीची आहे.   

महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ मिसळ (Popular Food Misal) या यादीत नवव्या (9व्या) क्रमांकावर आहे. अंकुरित मटकीपासून बनलेली, तिखट रस्सा आणि फरसाणसह सर्व्ह केली जाणारी मिसळ, कांदा, लिंबू आणि पावासोबत खाल्ली जाते. इन्स्टाग्रामवर आणि स्ट्रीट फूड कार्यक्रमांमुळे मिसळची लोकप्रियता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रातली अनेक खवय्ये मिसळला ‘ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स’ (Breakfast of Champions) मानतात.

(हेही वाचा – Amazon वर हिंदूंच्या श्रद्धा दुखावणाऱ्या पुस्तकाची विक्री; मुखपृष्ठावर कालीमातेचे अपमानास्पद चित्र)

भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी मोठी गोष्ट
TasteAtlas ची ही यादी प्रेक्षकांच्या मतांवर आणि अन्न तज्ज्ञांच्या परीक्षणावर आधारित असते. यादीत पारंपरिक युरोपीय किंवा पूर्व आशियाई पदार्थांचा वरचष्मा असतो, त्यामुळे भारताच्या स्ट्रीट फूड ब्रेकफास्टने यात स्थान मिळवणं ही मोठी गोष्ट आहे.
दिल्लीकरांचे आवडते – छोले भटुरे
या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे उत्तर भारतातील अस्सल आणि खास पदार्थ – छोले भटुरे. फुलपंखी तळलेले भटुरे आणि झणझणीत, मसालेदार छोले हा दिल्लीतल्या लोकांचा ‘ओरिजिनल ब्रेकफास्ट’ मानला जातो. ओल्ड दिल्लीच्या गल्लीपासून ते पंजाबी घराघरांत, छोले भटुरे अनेक पिढ्यांपासून ब्रेकफास्टचा बादशहा ठरला आहे.

(हेही वाचा – Balochistan liberation Army ने पाकिस्तानचे २३ जवान केले ठार)

देशाच्या हृदयातला स्वाद ‘पराठ्या’च्या आत
या यादीत 25 व्या क्रमांकावर आलेला पदार्थ म्हणजे पराठा. अगदी कोणत्याही प्रकारच्या सारणासह बनवले जाणारे पराठे भारताच्या प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. दही, लोणी, लोणचं किंवा अगदी चहा सोबतही त्याची जोडी जुळते. याशिवाय या यादीत भारतातातील छोले भटुरे, उत्थप्पा, डोसा, पराठा, आलू पराठा, मसाला डोसा या पदार्थांचाही समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.