Transfer : आस्तिक कुमार पांडे एमएमआरडीए सहआयुक्तपदी; पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

133
Transfer : बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली; विवेक जॉनसन नवे जिल्हाधिकारी
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, आस्तिक कुमार पांडे यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह अन्य अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Transfer)

(हेही वाचा – Cabinet Decision : कैद्याचा कोठडीत मृत्यू झाला तर सरकार देणार भरपाई)

रमेश चव्हाण यांची राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राहुल गुप्ता यांच्याकडे हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सत्यम गांधी यांना सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच, विशाल खत्री यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (आयटीडीपी) डहाणू येथे प्रकल्प अधिकारी आणि डहाणू उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Transfer)

(हेही वाचा – Bihar Businessman Murder Case: पुण्यातील मराठी व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा)

या बदल्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या नियुक्त्यांमुळे संबंधित विभाग आणि क्षेत्रांमध्ये विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. (Transfer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.