-
प्रतिनिधी
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरेयांच्या हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील अन्य दोषी, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर, यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, त्यांच्या शिक्षेचा कालावधी आधीच पूर्ण झाल्याने त्यांची सुटका झाली. (Ashwini Bidre-Gore Murder Case)
(हेही वाचा – “राहुल गांधींचे विधान अत्यंत निंदनीय, डोक्यावर परिणाम…” ; CM Devendra Fadnavis यांचा टोला)
११ एप्रिल २०१६ रोजी कुरुंदकरने मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून वसई खाडीत फेकल्याचा आरोप होता. नऊ वर्षे चाललेल्या या खटल्यात ८० साक्षीदारांची तपासणी झाली. मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे-अल्फान्सो यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी फाशीची मागणी केली होती, तर बिद्रे यांची मुलगी सिद्धी आणि पती राजू गोरे यांनीही कठोर शिक्षेची विनंती केली होती. (Ashwini Bidre-Gore Murder Case)
(हेही वाचा – Venkat Raghavan : तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम केलेले “वेंकट” कोण होते?)
न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून २१ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला. कुरुंदकरवर राष्ट्रपती पदकाची शिफारस केल्याने न्यायाधीशांनी संताप व्यक्त केला होता. या निकालाने बिद्रे कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Ashwini Bidre-Gore Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community