BMC Mumbai : अश्विनी भिडे आता पूर्णवेळ मुंबई मेट्रोत; मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी अमित सैनी

महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना अश्विनी भिडे या तीन  दिवस मुंबई महापालिकेत आणि दोन दिवस मुंबई मेट्रोच्या कामांसाठी वेळ देत तारेवरची कसरत करत होत्या.

1834
मुंबई महापालिकेत (BMC Mumbai) अतिरिक्त आयुक्त म्हणून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण केल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)  अश्विनी भिडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे  यांच्या रिक्त जागी अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. पण आता या पदी  त्यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये महापालिकेत (BMC Mumbai) अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या अश्विनी भिडे यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी न सोपवता त्यांना  ठाकरे सरकारने बाजुला केले  होते. पण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अश्विनी भिडे यांच्याकडे १२ जुलै २०२२ रोजी  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेत याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार भिडे यांच्याकडे होता.

अश्विनी भिडे यांची कसरत थांबणार 

परंतु आता महापालिकेच्या (BMC Mumbai) अतिरिक्त आयुक्त पदावरून त्यांची बदली करून आता पूर्ण वेळ मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती  केली आहे. त्यांच्या रिक्त जागी अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना अश्विनी भिडे या तीन  दिवस मुंबई महापालिकेत (BMC Mumbai) आणि दोन दिवस मुंबई मेट्रोच्या कामांसाठी वेळ देत तारेवरची कसरत करत होत्या. ही कसरत करतच त्यांनी  मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोन्ही  प्रकल्प आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कोस्टल रोड प्रकल्पाची एक मार्गिका  खुली झाली असून हा प्रकल्प  मे ,2024 पर्यंत पूर्ण प्रकल्प पूर्ण प्रकल्पाचे होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.