Asha Sevika : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; कारण…

89
Asha Sevika : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; कारण...

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक (Asha Sevika) आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये, तर ३ हजार ६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपयांची घसघशीत मानधन वाढ करण्यासह त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी (२ नोव्हेंबर) मुंबई येथे केली.

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात (Asha Sevika) आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – World cup 2023 : लंकेविरोधात विराटचं किंग, सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडणार?)

राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत (Asha Sevika) ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात ८० हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना ५ हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात ७ हजार रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५ हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

प्रवर्तकांनाही लाभ मिळणार

राज्यात 3,664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज 6,200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8,775 रुपये मानधन मिळत असून, आता त्यांना 21,175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्य मंत्री (Asha Sevika) प्रा डॉ. सावंत यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.