Maharashtra FYJC Admission 2025 : ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

76
Maharashtra FYJC Admission 2025 : ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी
Maharashtra FYJC Admission 2025 : ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील इयत्ता ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रियेला आजपासून दमदार सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल २,५८,८८७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली, अशी माहिती शिक्षण संचालक व राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी दिली आहे. ही प्रक्रिया २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांमध्ये (Students) उत्साहाचे वातावरण आहे. (Maharashtra FYJC Admission 2025)

९ हजारांहून अधिक महाविद्यालये, १८.७५ लाखांपेक्षा जास्त जागा

या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत ९,३३८ महाविद्यालये सहभागी झाली असून ‘CAP’ (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) अंतर्गत एकूण १८,७४,९३५ जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड पोर्टलवर करता येणार आहे. गुणवत्तेनुसार, प्राधान्यक्रम, आराखडा या निकषांवर जागा मिळणार आहे. (Maharashtra FYJC Admission 2025)

(हेही वाचा – Veer Savarkar :  ‘आज आपलं अस्तित्व जे टिकून आहे, ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच’; मंजिरी मराठे यांचे प्रतिपादन)

महत्त्वाच्या तारखा आणि सूचना विद्यार्थ्यांसाठी
  • ५ जून २०२५ रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर होणार आहे.
  • प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे अनिवार्य आहे.
  • व्यवस्थापन, संस्था अंतर्गत व अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश रद्दीकरणाची प्रक्रिया नीट समजून घेणे गरजेचे आहे.
  • प्रथम फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांत सहभागी होता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि मदत केंद्रे सज्ज

प्रवेश अर्ज भरताना अडचण येऊ नये यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. माहिती पुस्तिका आणि ऑनलाईन पोर्टलवर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे.

तांत्रिक अडचणी अथवा शंका असल्यास सहाय्यता क्रमांक ८५३०९५५५६४ वर किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी केले आहे. FYJC प्रवेश प्रक्रियेचा पहिला दिवस उत्साहवर्धक ठरला असून लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाच्या पुढच्या टप्प्यासाठी पहिला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे! (Maharashtra FYJC Admission 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.