
-
प्रतिनिधी
मुंबईतील आर्थर रोड कारागृहाचा (Arthur Road Jail) पुनर्विकास करण्यासाठी नव्या संकल्पनेतून ग्रीन एनर्जीचा वापर, सुरक्षेची काटेकोर यंत्रणा, तसेच सर्व कैद्यांसाठी स्वतंत्र कोठड्या असलेले बहुमजली आधुनिक कारागृह उभारण्यात यावे, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी मंत्रालयात दिले. पुनर्विकासासाठी महापालिकेकडून वाढीव चटई निर्देशांक (FSI) बाबत नियम शिथील करून प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
(हेही वाचा – Pandharpur Darshan : आषाढीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी; भाविकांनी दर्शनरांगेतच दिल्या घोषणा)
राज्यमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली आर्थर रोड कारागृहाच्या (Arthur Road Jail) पुनर्विकासासाठी आयोजित बैठकीत गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या डीजी आणि एमडी अर्चना त्यागी, सहसचिव धपाटे, तसेच नगर विकास व कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कदम यांनी स्पष्ट केले की, नवीन कारागृह आराखडा सादर करताना जागतिक दर्जाच्या सुरक्षा उपाययोजना व जागतिक मॉडेल्सचा अभ्यास अनिवार्य आहे. यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन आणि शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित कोठड्यांचा समावेश असावा.
(हेही वाचा – bakrid-eid-al-adha : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वजीव मंगल प्रतिष्ठानची केंद्र सरकारकडे मागणी, अध्यक्ष डॉ. गंगवाल म्हणाले…)
भायखळा कारागृहाच्या पुनर्विकासालाही गती देणार
आर्थर रोडप्रमाणेच (Arthur Road Jail) भायखळा कारागृहासाठीही स्वतंत्र पुनर्विकास आराखडा तयार करण्यात यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मानखुर्दमध्ये नवीन कारागृहासाठी २२ एकर जागेची पाहणी
राज्यमंत्री कदम यांनी भविष्यातील गरज लक्षात घेता मानखुर्द येथे प्रस्तावित २२ एकर जागेची पाहणी करून त्या जागेवर कारागृहासाठी आरक्षण ठेवण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश दिले. या संपूर्ण पुनर्विकास प्रक्रियेमुळे राज्यातील कारागृह व्यवस्थापन अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक होण्याची दिशा निश्चित झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community