Aqua Metro: मुंबईच्या भुयारी मेट्रोमध्ये जाल तर नॉट रिचेबल व्हाल…

57

Aqua Metro : मुंबई मेट्रोच्या बहुप्रतिक्षित भूमिगत अ‍ॅक्वा लाईन (लाइन-३) चा दुसरा टप्पा ९ मे रोजी सुरू झाला. ही मेट्रो आता आरे जेव्हीएलआर ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत प्रवाशांसाठी खुली झाली आहे. मात्र, मेट्रो सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत, त्यामुळे मोबाइल नेटवर्कच्या समस्यांमुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. भूमिगत विभागात व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ सारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या सेवा पूर्णपणे विस्कळीत आहेत. (Aqua Metro)

(हेही वाचा – Nala Safai : नाल्यातील गाळ काढण्यास का होतो विलंब, जाणून घ्या हे कारण)

प्रवाशांच्या अडचणी वाढल्या
भूमिगत स्थानकांमध्ये (Underground Metro) प्रवेश करताच, मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब होते आणि ते स्थानकातून बाहेर पडल्यावरच परत येते. यामुळे डिजिटल तिकिटिंगमध्येही समस्या येत आहेत. प्रवाशांना आता QR कोडचा स्क्रीनशॉट घेऊन मेट्रो स्थानकात जावे लागते किंवा ऑफलाइन तिकीट बुकिंगचा अवलंब करावा लागतो. तसेच प्रवाशांना आगाऊ तिकिटे खरेदी करण्याचा सल्ला देणाऱ्या सूचना आता मेट्रो स्थानकांवर लावण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Asia Cup 2025 : पाकिस्तानी संघाला क्रीडाविश्वातही धक्का बसणार?; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष)

वादामागील खरे कारण काय आहे माहित आहे का?
अ‍ॅक्वा लाईनच्या भूमिगत भागात टेलिकॉम नेटवर्क पुरवण्याबाबत वाद आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) म्हणते की व्होडाफोन, जिओ आणि एअरटेलने संयुक्तपणे इन-बिल्डिंग सोल्यूशन्स (IBS) मोफत बसवण्याची ऑफर दिली होती, परंतु MMRCL ने त्यांना राईट ऑफ वे (RoW) देण्यास नकार दिला. देशातील इतर प्रमुख महानगरे आणि विमानतळांप्रमाणेच सार्वजनिक निविदांमार्फत ते तटस्थ दूरसंचार पायाभूत सुविधा राबवत असल्याचे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.