Aqua Line Metro पहिल्या पावसात भुयारी मेट्रोची दैना; वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात भरलं पाणी, प्रवाशांनी व्यक्त केला संताप!

139

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरासह राज्याच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मान्सूनपूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेलं असताना सोमवारी २६ मे रोजी मुंबईतील भुयारी मेट्रो (underground metro) स्थानकात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या वरळी-आरे भुयारी मेट्रो मार्गावरील वाहतूक सोमवारी पावसामुळे विस्कळीत झाली. वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक (वरळी नाका) सेवा ठप्प झाली आहे, तर या स्थानकात सुरक्षा भिंत कोसळून मेट्रो स्थानकाचे छत कोसळले आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. (Aqua Line Metro)

(हेही वाचा – Maharashtra Rain Update: राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग; मुसळधार पावसामुळे ‘या’ ठिकाणी झाले नुकसान)

भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोईस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे. वरळी मेट्रो स्थानकात पाणी साठून चिखल झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi गुजरात दौऱ्यावर; कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबियांनी केले स्वागत)

पावसामुळे पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.