पूर्व उपनगरांतील म्हाडाच्या वसाहतींमधील मलनि:सारण वाहिन्यांची होणार सुधारणा; महापालिकेने नियुक्त केला सल्लागार

118
पूर्व उपनगरांतील म्हाडाच्या वसाहतींमधील मलनि:सारण वाहिन्यांची होणार सुधारणा; महापालिकेने नियुक्त केला सल्लागार
पूर्व उपनगरांतील म्हाडाच्या वसाहतींमधील मलनि:सारण वाहिन्यांची होणार सुधारणा; महापालिकेने नियुक्त केला सल्लागार

पूर्व उपनगरातील म्हाडा वसाहतीतील मलनि:सारण वाहिन्यांचे काम योग्य प्रकारे न झाल्याने तसेच त्यांची क्षमता अपुरी पडत असल्याने बऱ्याच वेळा मलनि:सारण वाहिन्या तुंबून मलजल रस्त्यावर येत आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांतील म्हाडा वसाहतींमधील मलनि:सारण वाहिन्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. वालभट ओशिवरा, दहिसर, पोयसर नदींसह पिंपरी चिंचवड, वसई विरार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया आणि पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या सल्लागार सेवेसाठी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

पूर्व उपनगरातील म्हाडा लेआऊट येथील विद्यमान रस्त्यांवर मलनि:सारण वाहिनींची क्षमता अपुरी पडत असल्या कारणाने तेथील मलनि:सारण वाहिनी तुंबून मलजल रस्त्यावर वाहत असते. पूर्व उपनगरातील विद्यमान म्हाडा वसाहतींमध्ये टाकण्यात येणाऱ्या तथा सुधारणा करण्यात येणाऱ्या मलनि:सारण वाहिनींचा अभ्यास, विश्लेषण, योजना, आराखडा तसेच संबंधत कामांसाठीच्या निविदा तयार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन्य या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा – BMC : वांद्रे पूर्व ते वाकोलादरम्यान यंदाही तुंबणार नाही पाणी; महापालिका प्रशासनाने केली ही उपाययोजना)

सल्लागाराची नेमणूक केल्याने व त्यानुसार प्रत्यक्ष काम झाल्यावर तेथील सभोवतालच्या परिसरातील मलनि:सारण समस्येचे निराकरण होऊन मलनि:सारण व्यवस्थेचा लाभ मिळेल व नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी होण्यास मदत होईल, असा विश्वास मलनि:सरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वालभट ओशिवरा नदी, दहिसर नदी, पोयसर आदी नदींचे पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टंड अंर्बन सोल्यूशन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचा पुनर्वापर आण पुनर्प्रक्रियेचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठीही सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आले होते. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या कामासाठीही या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वसई विरार शहरासाठी भूमिगत मलनि:सारण वाहिनी संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरारमध्ये मलनि:सारण वाहिनी संदर्भात केलेल्या सल्लागार म्हणून कामाच्या आधारे मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरातील म्हाडाच्या जागेमधील मलनि:सारण वाहिनीच्या कामांसाठी सल्लागार म्हणून नेमले असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.