
-
ऋजुता लुकतुके
ॲपलची सगळ्यात मोठी डेव्हलपर इव्हेंट यंदा ९ जून २०२५ ला होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहाला हा कार्यक्रम सुरू होईल आणि १३ जूनपर्यंत तो चालणार आहे. कॅलिफोर्निया क्लिपर्टिनो इथं ॲपल पार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यंदा कुठलंही नवीन उत्पादन लाँच होणार नसलं तरी ॲपलच्या सर्व ऑपरेटिंग प्रणाली, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, आयबड्स आणि विविध ॲपमध्ये होणारे तांत्रिक बदल या कार्यक्रमात लोकांसमोर आणले जातील. सगळ्याचं लक्ष असेल ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कंपनी करत असलेल्या नवीन प्रयोगांवर. याविषयीची माहिती आणि नवीन फिचर कंपनी नक्कीच लोकांसमोर आणेल. (Apple WWDC 2025)
सिरी, ईमेल ॲप अशा अनेक मूलभूत ॲपमध्येही बदल होणार आहेत. वर म्हटल्याप्रमाणे भारतीय वेळेनुसार, रात्री साडे दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. तो कुठे लाईव्ह बघता येईल ते पाहूया, (Apple WWDC 2025)
(हेही वाचा – Competitive Exams : युपीएससी, एमपीएससी, सीडीएस आणि एनडीए स्पर्धा परीक्षांवर महेश कुलकर्णींकडून मार्गदर्शन )
Apple developer app
Apple tv app
Apple you tube channel
(हेही वाचा – Padmanabhswami Temple : तब्बल २७० वर्षांनंतर श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभाभिषेक; विशेष धार्मिक विधी कसा असतो?)
यंदा ॲपल आयओएस, सिरी आणि सफारीसह अनेक मूलभूत ॲपमध्ये मोठे बदल करणार आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये एकाच प्रकारचा युझर इंटरफेस असेल अशी व्यवस्था ॲपलला करायची आहे. त्यासाठी काही बदल कंपनीला करावे लागणार आहेत. त्यांची माहिती कंपनीच्या ग्राहकांना देण्यात येईल. तसंच ॲपलच्या उत्पादनांसाठी नवीन व्हिज्युअल डिझाईनही बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. कंपनीने व्हिजन ओएस प्रणालीचा वापर सुरू केला आहे. (Apple WWDC 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community