Eye Flu : डोळे आल्यावर अँण्टीबायोटिक ड्रॉप्स वापरणे फायदेशीर आहे का ? वाचा नेत्रतज्ज्ञ काय सांगतात

डॉक्टरांच्या सल्ल्याने करा औषधोपचार, स्व उपचार टाळा

169

आय फ्लू अर्थात डोळे येणे.देशभरात हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरत आहे. जवळपास लाखो लोक महिनाभरापासून डोळे येण्याच्या समस्येला बळी पडले आहेत. आय फ्लू, कंजक्टिविटिस अर्थात डोळे येणे हा आजार बरा होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता अँण्टीबायोटिक आणि स्टिरॉइड आय ड्रॉप्स वापरतात. स्टिरॉईड आय ड्रॉप्स वापरल्यामुळे डोळ्यांची दृष्टी गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत याशिवाय काही जण इंटरनेटवर व्हायरल होणारे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्नही अशा वेळी करतात. त्यामुळे डोळे आलेल्या रुग्णांनी अँण्टीबायोटिक आणि स्टिरॉइड आय ड्रॉप्सचा वापर करावा का, या ड्रॉप्समुळे डोळे येण्याच्या समस्येवर आराम मिळू शकतो का? जाणून घेऊया याबाबत नेत्रतज्ज्ञ काय सांगतात-

डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये डोळे लाल होणे, जळजळ, सूज येणे, डोळ्यांमधून सतत घाण बाहेर येणे, अशा प्रकारचे त्रास होतात.संसर्गजन्य आजार असल्यामुळे 5 ते 7 दिवसांत हा आजार आपोआप बरा होऊ शकतो, मात्र काही जणांना हा आजार गंभीर स्वरुपात होतो. त्यामुळे बरे व्हायलाही वेळ लागू शकतो.अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. यामुळे इतर संसर्ग टाळण्यास मदत होते.

(हेही वाचा – Manipur Violence : पिडीतांसाठी पोर्टल बनवण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात दोन पिडीत महिलांनी दाखल केली याचिका)

हा एक सामान्य संसर्ग आहे. डोळ्यांसाठी फारसा धोकादायक नाही. डोळे आल्यामुळे अंधत्व किंवा दृष्टी कमी होण्याचा धोका नसतो. काही जण डोळे आल्यावर दृष्टी कमी झाल्याची तक्रार करतात, मात्र ही समस्याही काही दिवसांत आपोआप सुटू शकते.

अँण्टीबायोटिक ड्रॉप्स वापरणे फायदेशीर आहे का ?
अँण्टीबायोटिक आय ड्रॉप्स वापरल्याने डोळे येणे हा संसर्गजन्य आजार बरा होत नाही. याकरिता आर्टिफिशियल टियर आय ड्रॉप्स वापरणे फायदेशीर ठरते. अँटीबायोटिक ड्रॉप्सची हा विषाणुजन्य संसर्ग बरा होण्यासाठी मदत होत असली, तरीही डोळ्यांचा संसर्गजन्य आजार यामुळे बरा होत नाही. यांचा जास्त वापर केल्याने डोळ्यांमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता (एंटीबायोटिक रजिस्टेंस) निर्माण होऊ शकते. डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यास डॉक्टर रुग्णांना अँण्टिबायोटिक आय ड्रॉप्स वापरण्याचा सल्ला देतात, मात्र याची गरज फारच कमी प्रकरणांमध्ये असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये अँण्टिबायोटिक ड्रॉप्स टाकू नका.
नेत्रतज्ज्ञ काय सांगतात?
– डोळे आल्यावर लुब्रिकेंट आई ड्रॉप्सचा वापर करा. घराबाहेर पडू नका आणि डोळ्यांना हात लावू नका.जास्तीत जास्त विश्रांती घ्या. कोणत्याही प्रकारची गोळी खाऊ नका. घरगुती उपाय देखील करू नका अन्यथा समस्या वाढू शकते.

– कोविडॉन आयोडीन या आयड्रॉप्समुळे डोळे येण्याच्या समस्येवर आराम मिळू शकतो, मात्र या आय ड्रॉप्सचा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करावा. 3-4 दिवसांनंतरही डोळ्यांच्या फ्लूपासून आराम मिळत नसेल आणि संसर्ग वाढला असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे तपासणी करावी आणि योग्य उपचार करावेत. स्व-उपचाराने डोळ्यांना नुकसान होऊ शकते.

हेही पहा 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.