Anti Smoke Machine In Mumbai Road : मुंबईतील रस्त्यांवर महापालिका बसवणार धूळ प्रतिबंधक यंत्र

प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

276
Anti Smoke Machine In Mumbai Road : मुंबईतील रस्त्यांवर महापालिका बसवणार धूळ प्रतिबंधक यंत्र
Anti Smoke Machine In Mumbai Road : मुंबईतील रस्त्यांवर महापालिका बसवणार धूळ प्रतिबंधक यंत्र

मुंबईतील रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धूळ प्रतिबंधक यंत्र (Anti Smoke Machine) वाहने कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. तसेच प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (Anti Smoke Machine) बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

हवेतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त चहल हे बोलत होते. या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश देतानाच सक्त सूचनाही केल्या. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, बांधकामे व विकास क्षेत्रातील क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या संघटनांच्या प्रतिनिधींची हजेरी होती. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

या बैठकीत आयुक्त चहल यांनी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी तथा पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, असे निर्देश वजा सूचना केल्या आहेत. तसेच त्यापेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडीपत्रे/कापडांचे आच्छादन असावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी तुषार फवारणी (sprinkler) यंत्रणा असावी आणि धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

(हेही वाचा – Free Medicines : केंद्र सरकारचा रुग्णांना मोठा दिलासा; ‘AIIMS’ मध्ये ‘या’ आजारांवरही मिळणार मोफत औषधे)

प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. मेट्रो, रस्ते, उड्डाणूपल आदी शासकीय निर्माणाधीन कामाच्या ठिकाणीही ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह तुषार फवारणी व धूळ प्रतिबंधक संयंत्रांची व्यवस्था असावी. मेट्रो रेल्वेची बांधकामे सुरु असणाऱ्या ठिकाणी संबंधित यंत्रणांनी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देऊन आपल्या अखत्यारित सर्व उपाययोजना कराव्यात. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

तसेच इमारती अथवा कोणतेही बांधकाम पाडतानासुद्धा आजुबाजूने आच्छादन करुन नंतरच बांधकाम पाडावे, जेणेकरुन धूळ पसरणार नाही. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे. धूळ निर्माण होईल असे कोणतेही बांधकाम पूर्णत: झाकलेलेच असावे. बांधकामासाठी लागणारे मार्बल, दगड, लाकूड आदींची कटाई, ग्राइंडींग आदी कामे बंदिस्त भागात किंवा आच्छादन असलेल्या भागातच करावी. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे. (Anti Smoke Machine In Mumbai Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.