Anti India Slogans In JNU : जेएनयूमध्ये पुन्हा देशविरोध उफाळला; पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा

113
Anti-India Slogans In JNU :जेएनयूमध्ये पुन्हा देशविरोध उफाळला; पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा
Anti-India Slogans In JNU :जेएनयूमध्ये पुन्हा देशविरोध उफाळला; पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा

‘भगवा जालेगा’, ‘फ्री काश्मीर’, ‘अल्ला हू अकबर’, ‘तेरी कबर खुदेगी’: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयूच्या) (Anti India Slogans In JNU) भिंती पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी घोषणांनी विद्रूप झाल्या आहेत. जेएनयू कॅम्पसमधील अनेक भिंती “फ्री पॅलेस्टाईन”, “फ्री आयओके” आणि “मोदी तेरी कबर खुदेगी” (मोदी, तुमची कबर खोदली जाईल) अशा घोषणांनी विद्रूप करण्यात आल्याचे दिसत आहे. याशिवाय कॅम्पसच्या भिंतींवर ‘फ्री शर्जील’ असा संदेशही लिहिला आहे. विद्यापीठाच्या भिंतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा देणाऱ्या गुन्हेगारांची ओळख अद्याप पटलेली नाही. आतापर्यंत कोणतीही व्यक्ती किंवा गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. (Anti India Slogans In JNU)

(हेही वाचा – Instagram Reels : रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल)

सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीला डाव्यांचा आक्षेप

जेएनयूच्या भिंतींवर चित्रित केलेल्या संतापजनक घोषणांना उत्तर देताना अभाविपचे सचिव विकास पटेल म्हणाले, “आम्ही याबाबत प्रशासनाला निवेदन देऊ.” कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आम्ही सुरुवातीपासून मागणी केली होती. मात्र, काही डाव्या पक्षांच्या आक्षेपामुळे ते ठेवण्यात आलेले नाहीत. जेएनयूचे प्राध्यापक डॉ प्रवेश कुमार, या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हे निषेधार्ह आहे. या घटनांमुळे जेएनयूची प्रतिमा मलिन होत आहे.” यापूर्वीही जेएनयूमध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. (Anti India Slogans In JNU)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेएनयूमध्ये अशीच एक घटना नोंदवली गेली होती. त्यामध्ये अनेक प्राध्यापकांच्या कार्यालयांसह विद्यापीठ कॅम्पसमध्ये असलेल्या अनेक इमारतींच्या भिंतींवर वादग्रस्त घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. यापूर्वीही विद्यापीठ कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज-II इमारतीच्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य समाजाच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. ‘ब्राह्मण-बनिया’, ‘आम्ही तुमच्यासाठी येत आहोत’, “’आम्ही बदला घेऊ’, ‘ब्राह्मणांनी परिसर सोडावा’, ‘ब्राह्मणांनो भारत सोडा’, ‘आता रक्त होईल’ आदी घोषणा देण्यात आल्या होत्या. (Anti India Slogans In JNU)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.