मुख्यमंत्र्यांनी ताकीद देऊनही ठाण्यात खड्ड्यामुळे आणखी एक बळी

93

ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आधीच एका दुचाकीस्वाराला जिवाला मुकावे लागले होते, ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच ठाण्यातील एका रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता. तरीही ही दुसरी घटना घडली आहे.

कल्याण-बदलापूर पाईप लाईन रोडवरील घटना 

पहिल्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘पुन्हा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याचे कानावर येता कामा नये’, अशी सक्त ताकीद दिली होती. तरीही ठाण्यात खड्ड्यामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही आता दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ही मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या या ताकदीला तितकेसे गांभीर्याने घेत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. ठाण्यात बाईकस्वाराचा खड्ड्यात तोल गेला. याच वेळेस मागून भरधाव वेगात बस येत होती. यामध्ये हा दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला. यात या तरुणाचा अंत झाला. ही सर्व घटना शनिवार, 16 जुलै सकाळी कल्याण-बदलापूर पाईप लाईन रोडवर म्हाडा प्रकल्पासमोरील रस्त्यावर घडली. या अपघात प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अंकित थैवा असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

(हेही वाचा देवेंद्र फडणवीसांनी माईक, चिठ्ठीवरून केले विनोद!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.