पुन्हा दरड कोसळली; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत

130
पुन्हा दरड कोसळली; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत
पुन्हा दरड कोसळली; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा दरड कोसळली, एक्सप्रेस वेवरील कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. दरड कोसळण्याची घटना गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पडली असून, दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व देवदूत आपत्कालीन पथक आणि खंडाळा व वडगाव महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आयआरबी व देवदूत आपत्कालीन पथक युध्दपातळीवर मार्गावर पडलेली दरड हटविण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या काही दिवासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यात मुंबई आणि पुण्याचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा जोर आहे. या हंगामात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दरड कोसळण्याची ही पहिली घटना नाही. याआधी २४ जुलै रोजी खंडाळा घाटात आडोशी बोगद्यावजळ दरड कोसळली होती. तेव्हा वाहतूक विस्कळीत झाली होती आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही मार्गिका बंद ठेवण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा – ED संचालकांना सर्वोच्च न्यायालयाकडून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ)

मुंबईत दिवसभर पाऊस, जनजीवन मात्र सुरळीत

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर पावसाची संततधार कायमच होती, परंतु ज्याप्रमाणात मुंबईत अतिवृष्टी होण्याची भीती वर्तवली जात होती तसा काही अतिमुसळधार पाऊस मुंबईत पडला नाही. वातावरण ढगाळ आणि त्यातच पावसाची संततधार यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असला तरी प्रत्यक्षात दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाला १०० मि. मीचाही पल्ला करता आला नव्हता. मात्र, कुठेही मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले असून ज्या भागांमध्ये पाणी तुंबले होते, तेथील पाण्याचाही निचरा योग्यगतीने झाल्याने या पावसाने मुंबईकरांना घाबरवले असले तरी प्रत्यक्षात पाणी तुंबण्याचे प्रकार कुठेही न घडल्याने लोकांच्या मनातील महापालिकेवरील विश्वास आता दृढ होताना दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.