तुर्कीला आणखी एक धक्का! Mumbai IIT ने तुर्की विद्यापिठांसोबतचे सर्व शैक्षणिक करार केले स्थगित

16
Mumbai IIT : पाकड्याचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या तुर्कीला देशभरात विरोध सुरूच आहे. तुर्कीच्या सर्व वस्तूंवर देशभरातून बहिष्कार टाकला जात आहे. दरम्यान तुर्कीने भारताला संगमरवरी फरशी आणि सफरचंद फळाचा व्यापार थांबवण्याच्या घोषणे केली आहे. याबाबत देशातील अनेक मोठ्या संस्थांनी तुर्की सोबतचे सामंजस्य करार रद्द केले आहेत. या यादीत आयआयटी मुंबई देखील सामील झाला आहे. भारत आणि तुर्कीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने म्हणजेच आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे शैक्षणिक सहकार्य आणि सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केले आहेत. (Mumbai IIT)

दरम्यान जेएनयू (JNU), जमिया मिलिया इस्लामियासारख्या विद्यापीठांनी (Jamia Millia University) तुका सोबतचे करार रद्द केले आहेत. आयआयटी रुरकीनेही इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबतचा आपला सामंजस्य करार अधिकृतपणे रद्द केला आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत मुंबई आयआयटीने हे करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल; प. पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन )

भारताच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तुर्कीवर पाकिस्तानला लष्करी मदत केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे भारतात मोठे प्रमाणात तुर्की विरोधात निदर्शने होत आहेत. या हालचालीला ‘बॉयकॉट तुर्की’ या मोहिमेशी देखील जोडले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.