Anand Mathews Shoki: सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता – राज्यपाल रमेश बैस

107
Anand Mathews Shoki: सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता - राज्यपाल रमेश बैस
Anand Mathews Shoki: सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता - राज्यपाल रमेश बैस

व्यक्तिगत, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे, परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करून ते युवापिढीला सांगण्याचे अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज शोकी (Anand Mathews Shoki) करीत असलेले कार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

अमेरिकन सिनेमॅटोग्राफर व सनातन धर्माचे अभ्यासक आनंद मॅथ्यूज शोकी यांनी लिहिलेल्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, दि. १६ डिसेंबरला राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Security Alert: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा अलर्ट मोडवर, जाणून घ्या कारण… )

आज विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक ज्ञान – विज्ञान शिकवले जाते. मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे, परंतु जीवन जगण्याची कला त्यांना शिकवली जात नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोकं वैयक्तिक, सामाजिक तसेच राष्ट्र स्तरावर अशांत व बेचैन आहेत. सनातन धर्माच्या माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते, असे राज्यपालांनी सांगितले.

भारतीय तत्त्वज्ञानात गुरुला ईश्वरापेक्षाही अधिक महत्त्व दिले आहे, कारण गुरूच ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरुंचा शोध हा वास्तविक स्वतःचा शोध असतो. आनंद मॅथ्यूज यांनी गुरुंचा शोध घेताना सनातन धर्माचे अनुभवसिद्ध तत्त्वज्ञान सोप्या भाषेत युवकांना विशद करून सांगितले आहे, असे सांगून राज्यपालांनी लेखकाचे अभिनंदन केले. लेखक आनंद मॅथ्यूज यांनी आपल्या प्रस्तावनेतून अमेरिकेतून भारताकडे येण्याचा आध्यात्मिक प्रवास आणि गुरुंचा शोध याबद्दल माहिती दिली.

(हेही वाचा – Dharavi Redevelopment MP Shewale : उध्दव ठाकरेंचा धारावीच्या पुनर्विकासात खोडा, पण दादरकरांच्या घरांसाठी कधी काढणार मोर्चा खासदार शेवाळेंचा सवाल )

विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी. डी. बक्षी, कर्नल अशोक किणी, पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यूज शोकी, अध्यात्मिक गुरु मोहनजी, विश्व संवाद केंद्राचे मुख्य संवाद अधिकारी निशिथ भांडारकर व निमंत्रित उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.