-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बोरिवली पश्चिम येथील रेल्वे स्थानका शेजारील दवाखाना आणि प्रसूती गृहाची पाडून ठेवलेल्या जागेवर आता तळ अधिक आठ मजली इमारतीची पुनर्बांधणीचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येत असून याच्या प्रत्यक्ष कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार आहे. (BMC)
बोरीवली पश्चिम एस व्ही रोड वर के. एल. भन्साली, महानगरपालिका प्रसुतीगृहाची इमारत अस्तित्वात होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या संरचनात्मक तपासणी अहवालानुसार ही जुनी इमारत सी टू ए श्रेणीमध्ये असल्याचे घोषित करण्यात आली होती. परंतु ही इमारत ५० वर्षा पेक्षा जास्त जुनी असल्याने व इमारतीची अवस्था गंभीर असत्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीसाठी जास्तीचा खर्च करणे संयुक्तीक नसल्या कारणाने, जुन्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात संरचनात्मक दुरुस्तीसह इतर कामे करण्यापेक्षा ही इमारत पाडून नविन इमारत वाढीव चटई क्षेत्रानुसार बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही रुग्णालय इमारत आल्यानंतर या जागेवर नव्याने प्रसूतिगृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा मागवून कंत्राटदाराची करण्यात आली आहे. या तळ अधिक आठ मजली इमारतीच्या बांधकामासाठी १७.२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी ए एस बी एंटरप्रायजेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC)
(हेही वाचा – BMC School : शाळेचा पहिला दिवस; मुलांशी संवाद साधताना आयुक्तांना आठवले आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक)
अशाप्रकारे होणार बांधकाम
- आर. सी. सी स्वरुपाचे बांधकाम करणे
- लादी व डॅडो काम करणे
- आतील व बाहेरील गिलावा व रंगकाम करणे
- टेरेसचे व पाण्याच्या टाकीचे जल भेद्दीकरण करणे
- दरवाजा व खिडीकी/व्हेंटिलेटर/सुरक्षा ग्रिल/छताची कामे करणे
- वाळवी प्रतिबंधक उपाययोजना करणे
- पाणीपुरवठा व मलःनिसारणाची कामे करणे
- आवार भिंतीचे काम करणे
- आसपासच्या परिसराच्या विकास इंटरलोकिंग पेव्हर ब्लॉक
- इतर संबंधित कामे आणि विद्युत व यांत्रिकी कामे करणे
- सी. सी. टी. व्ही यंत्रणा, जन घोषणा यंत्रणा बसविणे
- आग प्रतिबंधक आणि अग्निरोधक यंत्रणा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community