मदर डेअरी आणि वेरका ब्रँडनंतर, अमूलनेही (Amul Milk) देशभरात दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. नवीन किंमती १ मे पासून लागू होत आहेत. अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय माझा, अमूल ताजा आणि अमूल गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ झाली आहे. (Amul Milk)
तीन महिन्यांपूर्वी, २४ जानेवारी रोजी, अमूलने दुधाच्या किमतीत १ रुपयांची कपात केली होती. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या ३ दिवस आधी, अमूलने दुधाच्या किमतीत वाढ केली होती, त्यानंतर अमूल गोल्ड दुधाची किंमत प्रति लिटर २ रुपयांनी वाढवण्यात आली होती. अमूल शक्ती आणि टी स्पेशलच्या किमतीही वाढवण्यात आल्या. (Amul Milk)
मदर डेअरी आणि वेरका ब्रँडने देशभरात दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली होती. दोन्ही कंपन्यांच्या नवीन किमती ३० एप्रिलपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर, मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लिटर ₹ ६७ वरून ₹ ६९ आणि टोन्ड दुधाची किंमत प्रति लिटर ₹ ५४ वरून ₹ ५६ झाली आहे. (Amul Milk)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community