Helmet : ‘या’ जिल्ह्यात हेल्मेट घातले नाही तर होतो १ हजार रुपये दंड 

जिल्ह्यात दुचाकींचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

99

अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, महापालिका, नगरपालिका, सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकीचालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तीस शिरस्त्राण अर्थातच हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खासगी आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदर आस्थापनेत येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना हा नियम लागू राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गित्ते यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात दुचाकींचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ सह १९४ ( ड) नुसार दुचाकीचालक व त्याच्यामागे बसून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील सर्व व्यक्तीस भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार सरंक्षण शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरंक्षण शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालक व मागे बसलेल्या व्यक्तिविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/१७७,२५०(१)नुसार तसेच कलम १९४(३) अन्वये गुन्हा नोंद करून एक हजार रुपये दंड तसेच वाहनधारकांच लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ कलम २५० नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर ५० क्यूबिक सेंटिमीटरपेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शीख समुदायातील व्यक्ती यास अपवाद राहतील.मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९४ (ड) अन्वये वाहनधारकाने नियम १२९ चे उल्लंघन केल्यास तो स्वतः तसेच ज्या आस्थापनामधील जागेवर गुन्हा घडला आहे,त्या आस्थापनेचे प्रमुख उपरोक्त उल्लंघनास जवाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.