मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी धैर्य आणि संयमाचे शिखर पार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिताला अखिल भारतीय चेतना बनवण्यात अविस्मरणीय योगदान दिले. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याला आपल्या लेखनाने ऐतिहासिक बनवणारे सावरकर, मातृभूमीवरील निष्ठा आणि समर्पणासाठी ब्रिटिशांच्या कठोर छळामुळे डळमळीत झाले नाहीत. त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ राष्ट्र वीर सावरकर (Veer Savarkar) यांना आदरांजली अर्पण करते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय समाजाला अस्पृश्यतेच्या पीडेतून मुक्त करण्यासाठी आणि त्याला एकतेच्या मजबूत धाग्यात बांधण्यासाठी समर्पित केले, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. २८ मे या दिवशी वीर सावरकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आदरांजली व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादी मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)
मातृभूमि की स्वाधीनता के लिए साहस और संयम की पराकाष्ठा पार करने वाले स्वातंत्र्यवीर सावरकर जी ने राष्ट्रहित को अखिल भारतीय चेतना बनाने में अविस्मरणीय योगदान दिया। 1857 के स्वतंत्रता संग्राम को अपनी लेखनी से ऐतिहासिक बनाने वाले सावरकर जी की मातृभूमि के प्रति निष्ठा और समर्पण को… pic.twitter.com/djDNWOYLOc
— Amit Shah (@AmitShah) May 28, 2025
अमित शाह यांनी वीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित एका गीताचा व्हिडिओही एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, वीर सावरकर यांनी रचलेले ‘आदी मी… अनंत मी…’ हे गाणे भारतमातेवरील अपार प्रेमाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक भारतियाच्या भावनिक अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. हे गाणे हिंदीमध्ये अनुवादित केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. हे अमर गाणे ऐका…
वीर सावरकर जी द्वारा रचित ‘अनादि मी… अनंत मी…’ गीत माँ भारती के प्रति अगाध प्रेम का प्रतीक और हर भारतीय की भावुक अभिव्यक्ति है।
इस गीत का हिंदी भावांतरण करने वाली पूरी टीम को बधाई देता हूँ।
यह अमर गीत जरूर सुनें… pic.twitter.com/VVWBDS5Btq— Amit Shah (@AmitShah) May 28, 2025
नुकतेच ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला २७ मे २०२५ या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळालेला हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर आणि नात असिलता सावरकर-राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, स्मारकाचे अस्थायी विश्वस्त अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community