Amit Shah यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अभिनंदन; ‘अनादि मी अनंत मी’ गीताची हिंदी आवृत्ती एक्सवर पोस्ट

82

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध नेते आणि मान्यवर त्यांना अभिवादन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्सवर पोस्ट करत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना अभिवादन केले आहे. विशेष म्हणजे अमित शाह (Amit Shah) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित ‘अनादि मी अनंत मी’ या गीताची हिंदी आवृत्ती एक्सवर पोस्ट केली आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे गीत बनवणाऱ्यांचे कौतुकही केले आहे.

(हेही वाचा – रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको; मंत्री Nitesh Rane यांचा इशारा )

या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, वीर सावरकर यांनी रचलेले ‘अनादि मी… अनंत मी…’ हे गाणे भारतमातेवरील अपार प्रेमाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या भावनिक अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. हे गाणे हिंदीमध्ये अनुवादित केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. हे अमर गाणे ऐका…

अनादि मै, अनंत मै हे गीत अनादी मी अनंत मी या गीताचे हिंदी रूपांतरण आहे. याचे कवी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदी गीताची निर्मिती दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केली आहे. गीताचा हिंदी अनुवाद वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे, तर निर्मिती संयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे. या गीताला संगीत वर्षा भावे यांनी दिले आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे, तर जयदीप वैद्य यांनी हे गीत गायले आहे. या गीताच्या व्हिडिओसाठी छायाचित्रण सतीश गरुड यांनी तर ध्वनिचित्र संकलन दिनेश भात्रे आणि रोहित अडसुर यांनी केले आहे.

२७ मे या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून या गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ देण्यात आला आहे. या सोहोळ्यानंतर रणजित सावरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह यांना या गीताच्या हिंदी अनुवादाची ध्वनिचित्रफित दाखवली. ती त्यांनी अतिशय तन्मयतेनं ऐकली, इतकंच नव्हे तर ती ध्वनिचित्रफित मागवूनही घेतली. तोच व्हिडिओ अमित शाह यांनी पोस्ट केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे गीत फेसबूकवर पोस्ट केले आहे. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.