Ambedkar Statue in SC : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकरांचा पुतळा, रामदास आठवलेंकडून सरन्यायाधिशांचे अभिनंदन

131
Ambedkar Statue in SC : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकरांचा पुतळा, रामदास आठवलेंकडून सरन्यायाधिशांचे अभिनंदन
Ambedkar Statue in SC : सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकरांचा पुतळा, रामदास आठवलेंकडून सरन्यायाधिशांचे अभिनंदन

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारला. (Ambedkar Statue in SC) त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. सर्वोच्च न्यायालय प्रांगणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा, ही कल्पना कशी सुचली, याची माहिती या भेटीत चंद्रचूड यांनी आठवले यांना दिली.

(हेही वाचा – Puntin on PM Modi : पुतीन यांच्याकडून नरेंद्र मोदींचे कौतुक ;म्हणाले आजच्या जगात हे सोपे नाही)

एका मासिकात गाऊन घातलेला वकिलाच्या पोशाखातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण पाहिला. त्याक्षणी मनाला वाटले की सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) प्रांगणात असाच गाऊन घातलेला वकिलाच्या पोशाखातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणे ऐतिहसिक काम

सर्व क्षेत्राप्रमाणे न्याय आणि विधी क्षेत्राला कायदेपंडित; विधिज्ञ; विद्वान; ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श प्रेरणा लाभते. त्यांचा कायदा विधीशी जवळचा संबंध; संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान देश घडविण्यात मोठे आहे. त्यांच्यासारख्या महामानवाचा पुतळा उभारला पहिजे, असे मला वाटले आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वकिलाच्या पोशाखातील पुतळा उभारण्यात आला. दरवर्षी 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आम्ही सर्वोच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत होतो. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा, ही इच्छा होती ती पूर्ण झाल्याची माहिती चंद्रचूड यांनी दिली. सर्वोच्च न्यायालय प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून ऐतिहसिक काम केल्याबद्दल आठवले यांनी चंद्रचूड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

(हेही वाचा – हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्याचे फायदे)

वकिलांना ऑफिस मिळवून देण्याची मागणी

रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनला भेट दिली. तेव्हा सर्व वकिलांनी आठवले यांचे स्वागत केले. वकिलांना मेडिक्लेम मिळण्यास अडचणी येतात, ते मिळवून द्यावे, तसेच सर्वोच्च न्यायालयात 15 हजार वकील आहेत. त्यापैकी केवळ 1 ते दीड हजार लोकांना ऑफिस मिळते. त्यामुळे येथे अधिक कार्यालयांची इमारत बांधून अधिक प्रमाणात वकिलांना ऑफिस मिळवून देण्याची मागणी वकिलांनी रामदास आठवले यांच्याकडे केली. त्यावर आपण नक्की केंद्र सरकारद्वारे मदत करू, असे आश्वासन रामदास आठवले यांनी वकिलांना दिले.

त्यानंतर सर्व वकिलांसोबत रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून विनम्र अभिवादन केले. (Ambedkar Statue in SC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.